Jump to content

पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

१५३



होवो आणि रोमन लोकांविरुद्ध आपणांस विजय मिळो अशी आम्ही. परमेश्वराजवळ प्रार्थना करितों. त्यांचे आमच्यावर राज्य असते तर. त्यांनी आम्हांला कांही दिले नसते पण सर्वस्वी आम्हांला लुटले असतें." अगदी अलीकडे टिपू सुलतानच्या राज्यांतील ब्रह्मवृंद टिपू सुलतानास युद्धामध्ये विजय मिळावा म्हणून अनुष्ठान करीत ही गोष्ट मराठा सैन्याचे नेते हरिपंत फडके यांनी आपल्या पत्रांत स्पष्ट केली आहे. (ऐतिहासिक टिपणे, भाग ५, पृष्ठ २८) ते म्हणतात, “रंगस्वामीपाशी व शिवालयीं ब्राह्मण अनुष्ठानास घालून प्रयोग चालले आहेत. एक ब्राह्मण जलांत मस्तक ठेवून.. दोन अडीच प्रहर वरते पाय करून अनुष्ठान करीत आहे. याशिवाय चाळीस ब्राह्मणांनी दुसरा पर्याय चालविला.” जनतेचा. संपूर्ण विश्वास हा अधिसत्तेचा पाया असतो हे वरील उदाहरणां-. वरून स्पष्टपणे सिद्ध होते.

 नागरिक म्हणविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या राष्ट्राच्या उत्कर्षा-: करितां मनोभावाने झटले पाहिजे. राष्ट्राची शक्ति क्षीण होईल किंवा ती दुभंगून जाईल असे कोणतेही कृत्य करता कामा नये. राष्टाच्या अभ्युदयार्थ अधिसत्तेने आपली शक्ति केंद्रीभूत केली असतां ती. शक्ति कमकुवत होणार नाही याबद्दल सदैव जागृत राहिले पाहिजे.

" देशांत स्थिरस्थावर झाल्यानंतर उपद्व्याप करू नका."


–पवित्र कुराण ७:५६


 राष्ट्रास मारक ठरेल असे कोणतेही कृत्य किंवा कट करण्यापासून आपण अलिप्त राहिले पाहिजे. कांहीतरी उपद्व्याप करून


† Preaching of Islam, Page 61.