पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५२
इस्लाम आणि संस्कृति


शाहीमध्ये कदापिही दिसून येत नाही. नागरिक म्हटला तर तो कोणत्याही धर्माचा, पक्षाचा वा मतप्रणालीचा असो त्याला स्वास्थ्य व संरक्षण मिळालेच पाहिजे. सबंध राष्टांत एकच परधर्मी नागरिक असेल तरी त्याला बिनधोक व सुखाने राहता आले पाहिजे असा इस्लामचा दंडक आहे. त्या राज्यशास्त्रांत परधर्मियांना इतके अभय देण्यांत आले आहे की त्यांनी त्याबद्दल आपुलकी व संपूर्ण समाधान व्यक्त केले आहे. स्टॅन्ले लेनपूल म्हणतो, "जनतेमध्ये समाधान नांदत होते. त्यांच्या धर्माचे राज्यकर्ते असतां त्यांना जे समाधान होते त्यापेक्षा जास्त समाधान व प्रसन्नता त्यांना मस्लिम राजवटात वाटत होती." + त्याचप्रमाणे त्यांना इतकी निर्भयता वाटत होता की रात्रौं द्वारें न लावतां ते झोपत असत असें रेव्हरंड डॉडस् या ख्रिश्चन धर्मोपदेशकाने लिहून ठेविले आहे. तो म्हणतो, " गुन्हेगारा व बेकायदा वागणूक यांमुळे बदनाम झालेले प्रांत मुस्लिमांच्या सामर्थ्यवान राज्याखाली येतांच इतके सुव्यवस्थित व सुरक्षित झाल की तेथील नागरिक रात्री दारें देखील लावीत नसत. जनावराना बाहेर पडतां येऊ नये म्हणून एक कोलदांडा अडकविलेला अस. मस्लिम · राज्यकर्त्यांविषयी परधर्मियांना इतका विश्वास वाट का, लढाईच्या वेळी मस्लिमांना विजय मिळावा अशी ते प्रार्थना करात. लंडन युनिव्हर्सिटीमधील अरबी भाषेचे प्रो. अर्नोल्ड यांनी Preacy ing of Islam नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये रोमन युद्धाच वेळी, मस्लिम राज्यकर्त्यांविषयी ख्रिश्चन लोकांनी काय उद्गार काढले आहेत हे दाखविले आहे. " आमच्यावर पुन्हां आपले राज्य


+ Moors in Spain, Page 43.


* Rew. Dodds, Page 106.