पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१५१



सुसंबद्ध महाभाग असून अत्याचाराला किंवा धर्माच्या नांवाखालीं होणाऱ्या आक्रमक वृत्तीला त्यांचा सक्त विरोध असे. बचावाचा किंवा आत्मसंरक्षणाचा त्यांनी सदैव पुरस्कार केला आहे. त्याच बरोबर परधर्मियांशीं युद्ध किंवा बदला न घेण्यास बजावलें आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर इजरत मुहम्मद यांनी अत्या - चाराचा निषेध केला आहे असें मला कबूल करावें लागतें. " + महाज बिन जबलची यमनचा गव्हर्नर म्हणून नेमणूक केल्यानंतर हजरत पैगंबरांनीं त्याला जो उपदेश केला तो पाहिल्यावर हजरत पैगंबरांचा अनत्याचारावर केवढा विश्वास होता हैं सहज कळून येण्यासारखें आहे. ते यमनच्या गव्हर्नरास म्हणाले, "तुम्हीं प्रजाजनांस अत्यंत दयाळू- पणानें व विचारानें वागविलें पाहिजे. तुम्हीं त्यांच्यांशी कठोरपणें वागतां कामा नये, किंवा त्यांची संपत्ति लुटतां कामा नये. दुःखितांचा शाप आपणांला भोंवतो हें लक्षांत ठेवा. त्रस्त लोकांचे सुस्कारे परमेश्वरचरणीं लवकर रुजू होतात या गोष्टीची आठवण असूं द्या.

 लोकशाहीमध्यें नागरिकांच्या लोकांचें राज्य म्हणावयाचें आणि लोकांचा जीव धोक्यांत राहावयाचा, त्यांना स्वास्थ्य लाभावयाचें नाहीं अशी परिस्थिति लोकशाहीला खचित भूषणावह नाहीं. राष्ट्र म्हटलें कीं त्यांत निरनिराळ्या धर्मांचे, विविध पक्षांचे किंवा मतप्रणालीचे लोक राहणारच.

आपल्या त्यांची पक्षाच्या किंवा धर्मांच्या लोकांकडेच जास्त लक्ष पुरवावयाचें, जास्त दखल घ्यावयाची आणि इतरांकडे दुर्लक्ष करावयाचें, त्यांच्या संरक्षणाची काळजी घ्यावयाची नाहीं असा पंक्तिप्रपंच खऱ्या लोक-


↑ Islam-Her Moral & Spiritual Value by Leonard, P. 72.