पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५०
इस्लाम आणि संस्कृति


इस्लाम मानव्याचा केवढा श्रेष्ठ पुरस्कर्ता आहे याची आपणांस कल्पना येईल.

 इस्लामी युद्धनीतीमध्ये मानव्याला व अनत्याचाराला कसें प्रधान स्थान आहे हे आपण वर पाहिले आहे. लूटमारीसारखे कृत्यही त्या युद्धनीतीला मंजूर नाही. एकदां लढाईच्या वेळी हजरत पैगंबरांची नजर चुकवून कांहीं सैनिकांनी एका मेंढयांच्या कळपावर धाड घातली. त्यांपैकी काही मेंढया कापून त्यांचे मांस चुलीवर शिजत ठेविलें. हजरत पैगंबरांना ही वार्ता लागतांच ते तडक त्या ठिकाणी गेले आणि मांस शिजणारे भांडे उपडे करून सैनिकांना म्हणाले, " अशा त-हेचा लूट केलेला दुसऱ्याचा माल खाणे हराम (निषिद्ध) आहे." त्याचप्रमाणे सैनिकांनी नागरिकांना त्रास दिला तर त्या नागरिकांना समक्ष बोलावून आणून आपल्या सैनिकांनी केलेल्या अपराधाबद्दल दिलगिरी प्रदर्शित करीत, इतकेच नव्हे तर त्याना नुकसानभरपाईही देत.

 इस्लामच्या या उदार शिकवणीमळे जलूम किंवा अत्याचार या पासून मुस्लिम सैनिक अलिप्त असत. आपल्या देशावर शत्रूचा था, म्हणजे लटमार, आपत्ति, दुष्काळ आणि मूर्तिमंत हाहाःकार र कल्पना इस्लामने पार बदलून टाकली. शत्र झाला तरी वागता सहृदयतेचा अवलंब केला पाहिजे, अनत्याचाराचे व्रत स्वीकारल पाहिजे, माणुसकीने वागले पाहिजे असा नवा दंडक हजरत पैगंबरानी घालून दिला. हजरत पैगंबरांना अत्याचाराबद्दल वाटत असलेला तिटकारा व त्याबद्दल त्यांनी आपल्या अनुयायांना केलला उपदेश यांवर एका आंग्ल ग्रंथकाराने स्वच्छ प्रकाश टाकला आहे. तो म्हणतो, "हजरत महम्मद पैगंबर न्यायी, विश्वासू आणि