पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१४९



धि:क्कार केला आहे. लढावयाचें तर ते शत्रंशी! त्यांच्या स्त्रियांनी किया कच्च्याबच्च्यांनी आपलें काय वाईट केले आहे, त्यांना काय म्हणून छळावयाचे. त्यांच्यावर काय म्हणन अत्याचार करावयाचे, त्याचे काय म्हणन बळी घ्यावयाचे असा स्पष्ट सवाल टाकून त्या लढवय्यांना अत्याचारापासून परावृत्त करण्याचे कार्य इस्लामनें केलें आहे. त्या काळचा विचार केला म्हणजे इस्लामची मानवता विशेषपणे आपल्या डोळ्यांत भरते. त्या काळी शत्रंच्या स्त्रिया, मुलेबाळे आणि वृद्धांची एकजात कत्तल करणे, त्यांच्या शेतांतील पिके व फळझाडे उध्वस्त करणे, त्यांची प्रार्थनामंदिरें धुळीला मिळविणे, लूटमार करणे वगैरे अनन्वित प्रकार होत. अशा परिस्थितीत “स्त्रिया, मुल व वृद्ध यांना ठार मारूं नका, त्यांची पिकें जाळं नका, फळझाडे तोडूं नका, त्यांच्या प्रार्थनामंदिरांना धक्का लावं नका आणि टमार करूं नका" अशी इस्लामने दिलेली आज्ञा मागें कोठेतरी आपण पाहिलीच आहे.
 युद्धामध्ये कैदी झालेल्या शत्रंना किती माणुसकीने वागविलें जाते याचे हृद्य वर्णन सर वुईल्यम मूर यांनी केले आहे. ते म्हणतात, “मुस्लिम सैनिक आपले स्वतःचे अन्न कैद्यांना देत आणि आपण नुसन्या. खजूरावर वेळ भागवीत. एक कैदी त्यांना म्हणाला, "मदिनेच्या मस्लिमांवर परमेश्वरी कृपेचा वर्षाव होवो. आम्हांस वाहनावर बसून ते स्वतः पायी चालत, त्यांच्याजवळ अगदी थोडे अन्न असतां तें सर्व आम्हांला देऊन टाकीत." आजच्या सुधारलेल्या काळांतही शत्रंना अमानुषतेने वागविण्यांत येतें या गोष्टींचा विचार केला आणि इस्लामचा सहृदयतेचा वरील आदेश पाहिला म्हणजे