पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४८
इस्लाम आणि संस्कृति



चालला असेल त्या ठिकाणी प्रतिकार करा असा त्याने आदेश दिला आहे. अशा त-हेचा प्रतिकार करीत असतां जर मरण आले तर ते शूराचे मरण आणि अत्याचारी माणसाची त्याच्या हातून हिंसा झाली तर ती अहिंसा असें इस्लाम मानतो. इस्लामनें आपल्या अनुयायांस शूराची अहिंसा किंवा अनत्याचार शिकविला आहे.

 " परमेश्वर जुलूम किंवा अत्याचार करणारावर प्रेम करीत नाही."

-पवित्र कुराण ४२:४०


 जुलूम, जबरदस्ती किंवा अन्याय यांना पायबंद घालण्याच कार्य इस्लामचे असल्यामुळे अशा अत्याचारांचा धिक्कार करण्यात आला आहे. निरपराधी लोकांवर जुलूम किंवा अत्याचार करणाया दुष्ट माणसावर परमेश्वर प्रेम करणे शक्य नाही. परमेश्वरास प्रिय असणाया मानवांचे स्वास्थ्य नष्ट करणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरास दुखविणे होय. मुस्लिम म्हणविणाऱ्या व्यक्तीने असें घोर पाता कधीही करता कामा नये. माणसाच्या आयुष्यांत कांही असे प्रसन येतात की त्या वेळी अत्याचार करण्याची वत्ति सहज बळावत; पण परमेश्वराचे स्मरण ठेवून त्या दुष्ट वृत्तीस लगाम घातला पाहिल आपद्धर्म म्हणन एकादा बाका प्रसंग ओढवला तरी त्या वेळी दखा आपण मोठा संयम दाखविला पाहिजे. उदाहरणार्थ, लढाईचा का म्हणजे अत्याचाराचा मोसम, अशा प्रसंगी माणसाची सद्बुद्धि न पावते आणि तो संताप व द्वेष यांच्या आहारी जातो. फक्त शत्रूशा मुकाबला न करतां शत्रच्या स्त्रिया, मुले आणि वृद्ध आप्तेष्ट याच्या वर अत्याचार केले जातात, त्यांची संपत्ति लुटली जाते, त्याच्या अब्रूची धुळधाण करण्यांत येते. इस्लामनें या पाशवी अत्याचाराचा