पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१४७



मनामध्ये संभ्रम उत्पन्न होऊ नये म्हणून अत्याचाराची व्याख्या काय किंवा त्याची मर्यादा कोणती हे आपण समजावून घेतले पाहिजे. रक्तपाताचे प्रत्येक कृत्य म्हणजे अत्याचार होऊ शकेल काय याचाही आपण विचार केला पाहिजे.

 "जुलूम होत असतां एकाद्याने प्रतिकार केला तर त्याला दोषी ठरवितां येत नाही."

-पवित्र कुराण ४२:४१.


 अन्यायासाठी झगडा म्हणजे अत्याचारी कृत्य नव्हे किंवा जुलुमाचा प्रतिकार म्हणजेही अत्याचार नव्हे. एकादें कृत्य अत्याचाराचें आहे किंवा नाही हे नीतीच्या निकषावर घांसून पहावें लागते. नीतीच्या मर्यादा ओलांडन किंवा नैतिक मूल्ये पायदळी तुडवन कोणतेही कृत्य केले तर ते अत्याचाराच्या सदरांत येऊ शकतें, अन्याय किवा जुलूम यांचा प्रतिकार करीत असतां रक्त सांडले गेले तर ते कृत्य केव्हाही अत्याचाराचे होणार नाही. निरपराध माणसावर हल्ला झाला असतां किंवा एकाद्या नरपशपासून सुशील स्त्रीच्या चारित्र्याचे रक्षण करीत असतां जर रक्ताचा सडा पडला तर तो अत्याचार होऊ शकत नाही. याच्या उलट एकाद्या अनाथ गहस्थास आपण अपशब्द बोललो किंवा एकाद्या सज्जनास निष्कारण दखविले तर तो मात्र अत्याचार समजला जाईल. आपल्यासमोर धडधडीत अन्याय चालला असतां, नैतिक मूल्यांची धळधाण उडविली जात असतां, डोळे मिटून उभे राहणे किंवा स्तब्धपणे बाजूला निघन जाणे हा अनत्याचार नव्हे तर चाललेल्या अत्याचारास प्रत्यक्ष प्रोत्साहन होय. अशा भ्याड वृत्तीचा इस्लामला मनापासून तिटकारा आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय किंवा अत्याचार