पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६
इस्लाम आणि संस्कृति


संपादन केला आहे. एक ग्रंथकार म्हणतो, " आपण दिलेल्या वचनाचे अत्यंत निष्ठेने परिपालन, सर्व जातीच्या लोकांना कोणताही भेदभाव न बाळगतां निस्पृहपणे दिलेले न्यायदान, यांमुळे मुस्लिमांनी जनतेचा विलक्षण विश्वास संपादन केला."

 निस्पृह न्यायदान हे लोकशाहीचे वैभव तर अनत्याचार ही तिची शक्ति आहे. अधिसत्ता टिकविण्याकरितां किंवा राजकारण यशस्वी करून दाखविण्याकरितां कित्येक वेळां अत्याचाराचा अवलंब करावा लागतो ही विचारसरणी त्या अधिसत्तेच्या किंवा राजकारणाच्या कमकुवतपणाची द्योतक आहे. न्यायाच्या व प्रेमाच्या जोरावर अधिसत्ता टिकते; अत्याचाराच्या जोरावर नव्हे. अत्याचारान तात्पुरती शांतता नांदेल, पण ती वादळापूर्वीची शांतता हाय. अत्याचारामळे अधिसत्ता तर राहोच पण स्वतःचे अस्तित्व देखील धोक्यात येते हे जनतेनेही पण लक्षात घेतले पाहिजे. केवळ द्वेषान किंवा भावनेनें धुंद होऊन एकाद्या वर्गावर किंवा समाजावर अत्याचार करणें हें केव्हाही आत्मघातकीपणाचे आहे. आपण बहुसंख्याक आहोत किंवा राज्य आपलें आहे म्हणून अल्पसंख्याकांवर जुन करणे किंवा त्यांना दडपून टाकणे हा पराक्रम तर नव्हेच पण कमकुवतपणा आहे. अत्याचार ही पराक्रमाची कसोटी नव्हे पण कमकुवतपणाची निशाणी आहे. योग्य मार्गाचा अवलंब न करता एकदम अत्याचारास प्रवृत्त होणे हे शक्तीपाताचे लक्षण आहे.

 राष्टास किंवा आपल्या स्वतःस कमजोर करणाऱ्या अत्याचार वृत्तीपासून आपण सर्वस्वी अलिप्त राहिले .. पाहिजे. मात्र आपल्या


† History of Dominions of Arabs in Spain.