पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१४५



वाटली आणि प्रार्थना एवढ्याकरितां केली की त्या तरुणाचे तोंड पाहिल्यावर तो माझा मुलगा नव्हे असे मला आढळून आले आणि असा नीच मनुष्य माझ्या पोटी जन्मास घातला नाही म्हणून परमेश्वराला आळविलें.

 प्रत्यक्ष राजप्रमुख असला तरी देखील त्याला अन्यायी वृत्तीबद्दल जाब विचारण्याचा जनतेला अधिकार आहे. राजप्रमुख गुन्हा करूं शकत नाही किंवा त्याला न्यायासनापुढे उभे करता येत नाही असा इतरत्र असणारा दंडक इस्लामने झुगारून दिला आहे. राजप्रमुख हा देखील आपल्यासारखाच एक माणूस आहे. एका गरीब माणसाला त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल सजा व्हावी आणि राजप्रमुखाला तशाच गुन्ह्याबद्दल कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवावें हा अन्याय आहे असें इस्लाम समजतो. त्याची जबाबदारी लक्षात घेतां त्याला न्यायाच्या बाबतींत एकाद्या गरीब माणसापेक्षा जास्त जबाबदार धरण्यांत आले पाहिजे. न्यायासनासमोर गुन्हेगार म्हणन उभे राहणारे अनेक राजप्रमुख किंवा सर्वाधिकारी इस्लामच्या इतिहासांत आढळून येतील. सुलतान महमंद तघलक याचें नांव सर्वश्रुत आहे. त्याने एका हिंदु मुलास निष्कारण फटके लगावले म्हणन त्या मुलाने काझीकडे फिर्याद नेली. काझीनें सुलतानास न्यायालयांत हजर राहण्यास फर्माविलें. सुलतान हजर झाल्यानंतर काझीने जितके फटके या हिंदु मलाला मारले तितके त्या हिंद मलाने सुलतानास मारावे असा निकाल दिला. सुलतान महमंद यांनी आपली पाठ उघडी केली आणि त्या मुलाने एकवीस फटके लगावले.

 इस्लामच्या या असामान्य न्यायी वृत्तीमुळेच मुस्लिम ज्या ज्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी त्यांनी तेथील नागरिकांचा विश्वास

इ.सं.१०