पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७६
इस्लाम आणि संस्कृति



 "मध्ययुगीन काळांत मुस्लिमांचा इतिहास म्हणजे जागतिक सुधारणेचा व संस्कृतीचा जिवंत इतिहास होय.” गाकील History of Inventions या ग्रंथांत बेकमन म्हणतो, - " अरब हे केवढे थोर लोक होते ! विपुल ज्ञान व अत्यंत उपयुक्त ठरलेले वैज्ञानिक शोध यांची आम्हांस देणगी देऊन त्यांनी आम्हांला कायमचे ऋणी करून ठेविलें आहे." हयम बोल्ट नांवाचा विख्यात ग्रंथकार लिहितो, “युरोपमध्ये दोनशे वर्षे थैमान घालीत असलेला रानटीपणा अरबांनी हांकलून दिला. ग्रीक तत्त्वज्ञानाचे मूळ त्यांना शोधून काढले. त्या ज्ञानाचे पुनरुज्जीवन करून ते थांबले नाहात तर त्यांत त्यांनी अमोलिक भर घातली आणि निसर्गाचा अभ्यास करण्याकरितां नवे मार्ग शोधन काढले." वर उध्दत केलल विद्वानांचे विचार कितपत यथार्थ आहेत याचे आपणाला 'सिंहावलोकन करावयाचे आहे.

खगोलशास्त्र ( Astronomy)


 खगोलशास्त्राचा खोल अभ्यास व त्याचे संशोधन यांमुळे मुस्लिमांनी त्या शास्त्रांत ज्ञानाची अपूर्व अशी भर घातली आहे. युरोपमधील खगोलशास्त्रवेत्ते अरब मस्लिमांना अद्यापही आपले गुरु मानतात. पृथ्वीचा आकार, तिचे मोजमाप, चंद्रसर्याच्या गताचा कोष्टकें, ताऱ्यांचे नकाशे, ग्रहणांचे वेध, ज्योतियंत्रांचा शाध, ग्रहांची जंत्री वगैरे या शास्त्रांतील अनेक अंगोपांगांमध्ये मुस्लिमांना प्रावीण्य संपादिले आहे. त्यांनी या शास्त्रांत लावलेले शोध आजही मार्गदर्शक समजले जातात. भाई मानवेंद्र रॉय म्हणतात, “ मनुष्याचा दृष्टि व्यापक करणाऱ्या व निसगांच्या नियमांशी ओळख करून