पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विज्ञान

१७५


स्नेही, निर्जन प्रदेशांतील विश्वास व एकांतवासामधील सोबती आहे. जीवनाच्या सुखदुःखांत विज्ञान मार्गदर्शन करते.

 इस्लामधर्म-प्रणेत्यांचा हा महान संदेश मुस्लिम राज्यकर्त्यांनी आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवला व त्याबरहुकूम विज्ञान व शास्त्र यांचा विकास व उत्कर्ष व्हावा एतदर्थ त्यांनी अविश्रांत परिश्रम केले. मध्ययुगांत बगदाद, कैरो, क्रोडोवा ही मस्लिम राजधानीची शहरें म्हणजे विद्या आणि संस्कृति यांची केंद्रे बनली होती. एक ग्रंथकार लिहितो, " त्या काळचा दरबार अत्यंत देदिप्पमान होता. शास्त्रज्ञ, साहित्यिक, कवी, वैद्यकविशारद आणि तत्त्वज्ञानी यांचा तेथे सत्कार होत असे. जातिभेदाचा विचार न करतां राजाश्रय देण्यांत येई. राजदरबारी ज्यू व रिव्रश्चन यांचें सारखेच स्वागत होई." + एस. पी. स्कॉट नांवाचा ग्रंथकार या विद्याप्रेमी मुस्लिम खलिफांना धन्यवाद देतांना लिहितो, "इस्लाम धर्माने अशा राज्यकर्त्यांची मालिका निर्माण केली की ज्यांचे ध्येय आपल्या प्रजाजनांना संपन्न करणे, ज्या योगें अनेक पिढ्यांना फायदा पोहोचेल अशा विद्यांची संपदा मागे ठेवणे, कधीही निष्प्रभ होणार नाही अशा बुद्धिमत्तेचे वर्चस्व निर्माण करणे हे होते." *

" न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते” असे समजणाऱ्या सुविद्य खलिफांच्या कृपाछत्राखाली मुस्लिमांनी ग्रीक विद्या, कला व तत्त्वज्ञान यांचे पुनरुज्जीवन केलेच ; पण त्याही पुढे जाऊन निरनिराळ्या शास्त्रांचा शोध लावून त्यांनी सर्व जगास उपकृत करून ठेविलें आहे. ग्रेयार्ड आपल्या ज्ञानकोशांत लिहितो, -


I Islam in the World, Page 96.


† Islam in the World, Page 109.


* The History of Spain, P. 115.