पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७४
इस्लाम आणि संस्कृति



वैज्ञानिक प्रगति ही मानवी जीवन संपन्न व सौख्यपूर्ण करते असा इस्लामचा विश्वास आहे. मात्र त्या वैज्ञानिक प्रगतीवर नीतिशास्त्राचे बंधन राहिले पाहिजे असा त्याचा आग्रह आहे. मानवांच्या कल्याणाकरितां, त्यांच्या स्वास्थ्याकरिता विज्ञानाचा उपयोग करण्यांत यावा; उलट तें मानव जातीच्या संहारास हातभार लावीत असेल तर त्या विज्ञानास स्थान नाहीं हा दृष्टिकोन समोर ठेवून मुस्लिमांनी विज्ञानाच्या प्रगतीस हातभार लावला आहे.

 इस्लाम धर्मांत विज्ञानास विरोध नाही हे मागे एका प्रकरणांत आपण पाहिले आहे. आपल्या शिकवणीच्या अग्रभागी चमत्काराऐवजी मानवी बुद्धिमत्तेस स्थान दिल्यामळे विज्ञान किंवा तर्कशास्त्र यांना न पटणारे एकही वाक्य स्वीकारावयास इस्लाम तयार नाही. विज्ञानास न पटणाऱ्या चमत्कारापेक्षा, निसर्ग व जीवनाच्या शाश्वत चमत्कारांवर इस्लामने जास्त भर दिला आहे. या बौद्धिक बैठकामळेच इस्लाममध्ये विज्ञानाचा पुरस्कार इतक्या प्रभावी रीतीने हा शकला. हजरत मुहम्मद पैगंबरांनी विज्ञानास उत्तेजन दिले इतका नव्हे तर वैज्ञानिक ज्ञानास पुण्याईचे स्थान मिळवून दिले. त्याना काढलेले उद्गार अभ्यासण्यासारखे आहेत-

 " विज्ञानाचे शिक्षण द्या. जो हे ज्ञान,घेतो तो परमेश्वरास भूषवितो; जो हे ज्ञान देतो त्याला ज्ञानधर्माचे पुण्य मिळते; ज्याच्याजवळ हे ज्ञान आहे तो आदरणीय व उपकारकर्ता होऊ शकतो. विज्ञान हे भ्रम व पाप यांपासून वाचविते. त्याने नंदनवनाचा मार्ग मोकळा होतो. विज्ञान हा आपल्या प्रवासामधील