पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ७ वें
इस्लाम आणि विज्ञान


 "लॅटीन मार्गाने नव्हे तर, अरबांकडून हल्लीच्या जगाला तेज 2 आणि शक्ति यांची देणगी मिळाली आहे."+

-एच्. जी. वेल्स


 विज्ञान आणि भौतिक शास्त्रांत मुस्लिमांनी जे मानाचे स्थान मिळविले आहे त्याबद्दल जगांतील मान्यवर शास्त्रज्ञांनी गौरवाचे उद्गार काढले आहेत. वरील क्षेत्रांतील मुस्लिमांच्या असामान्य कर्तत्वामुळे जगाच्या संस्कृतीत फार मोलाची भर पडली आहे. आज सर्वमान्य झालेल्या कित्येक शास्त्रांचे जनकत्व मुस्लिमांकडे आहे हे कळल्यानंतर कित्येकांना आश्चर्य वाटेल. मुस्लिमांनी विज्ञान व भौतिकशास्त्रांत जी अमूल्य कामगिरी केली तिला उद्देशून आजचे विख्यात शास्त्रज्ञ एच. जी. वेल्स यांनी वरील उद्गार काढले आहेत. ते उद्गार लक्षात घेतले म्हणजे मुस्लिमांनी नुसत्या युरोपवर नव्हे तर साऱ्या जगावर केवढे उपकार करून ठेविले आहेत याची आपणांस कल्पना येते.

 मानव जातीचा उत्कर्ष व सौख्य साधण्याकरितां इस्लामने ज्या साधनांचा पुरस्कार केला आहे त्यांमध्ये विज्ञानाची प्रामुख्याने गणना होते. इस्लाममध्ये विज्ञानाविषयीं अप्रीति नाहीं, निषेध कर नाहींच नाही; उलट विज्ञानास श्रेष्ठ स्थान देण्यांत आले आहे.


+ Outline of History, P. 432.


१७३