पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२
इस्लाम आणि संस्कृति



नसून सत्त्वशीलता, ज्ञान, प्रेम किंवा शक्ति ही होत, त्यामुळे self negation चे तत्त्व घातुक व विषारी आहे. समाजांत निःसत्त्व वृत्ति, उदासीनता आणि शैथिल्य वाढत असल्यामळे Self negation तत्त्वाचा त्याग करणे हेच श्रेयस्कर आहे असे डॉ. इक्बाल यांनी प्रतिपादिले आहे.