पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि तत्त्वज्ञान

१७१



पंजाबमधील सियालकोट शहरी इ. स. १८७६ साली झाला. एम्. ए. पदवी घेतल्यानंतर ते युरोपास गेले व तेथें अध्यात्म विषयावर एक विद्वत्तापूर्ण प्रबंध लिहिला. या प्रबंधामुळेच त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसफी ही पदवी मिळाली. असरारे खुदी, रमूझ बेखुदी, झबूरे अजम, जावेदनामा आणि पयामे मश्रीक हे तत्त्वज्ञानाने भरलेले काव्यग्रंथ त्यांनी पर्शियन भाषेत प्रसिद्ध केले. या काव्यग्रंथांमुळे डॉ. इक्बाल हे 'तत्त्वज्ञ कवी' या संज्ञेनें सबंध आशिया खंडांत प्रसिद्धीस आले. त्यांच्या असरारे खुदी' या काव्य ग्रंथाचे भाषांतर केंब्रिज युनिव्हर्सिटीचे प्रो. निकोलसन यांनी केल्यामुळे पौर्वात्य देशाप्रमाणे पाश्चिमात्य देशांतही त्यांचा बोलबाला झाला.

 डॉ. इक्बाल यांनी मुस्लिमांच्या, हल्लीच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि नैतिक परस्थितीचे फार सुंदर विश्लेषण केले आहे. Annihilation of Self चे तत्त्व आपल्या प्रगतीस व कर्तत्वास मारक आहे असे त्यांचे स्पष्ट मत आहे. सर्वसंगपरित्याग हा इस्लाम घर्मास मुळींच संमत नाही, इतकेच नव्हे तर मानवी प्रगतीच्या मार्गातील ती एक मोठी धोंड आहे असे त्यांना वाटते. डॉ. इक्बाल यांनी Preserving Self चे तत्त्व फार जोराने प्रतिपादले आहे. कांहीं सूफी तत्त्वज्ञ म्हणतात त्याप्रमाणे Self negation तत्त्व त्यांना मान्य नाहीं; त्याऐवजी त्यांनी Self affirmation च्या तत्त्वाचा पुरस्कार केला आहे. हजरत पैगंबर म्हणतात, 'परमेश्वराच्या विशेष गुणधर्माशी समरस व्हा.' परमेश्वराचे विशेष गुणधर्म म्हणजे निःसत्त्वपणा, अज्ञान, द्वेष किंवा भीरुता