पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७०
इस्लाम आणि संस्कृति




भाषांतरे झाली आहेत. पवित्र कुराणमधून घेतलेल्या महत्त्वाच्या ऋच्यावर हा ग्रंथ आधारलेला असून कुराणमधील तत्त्वज्ञानाची त्यांनी विस्तृत चर्चा केली आहे. सूफी तत्त्वज्ञानावर जे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत त्यांपैकी काही अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ समजले जातात.

 ग्रंथकार व त्या ग्रंथांची नांवे अशी :-

 (१) अबू नस्र कृत किताबुल लुमा फि तसव्वुफ
 (२) अबुल कासीम कशायरी कृत रिसालये कुशयरिया
 (३) अली कृत कशफुल महजूब
 (४) इमाम गज्झाली कृत इहयाउल उलूम
 (५) इब्नूल अरबी कृत फुतुहातुल मक्कीया
 (६) ,, ,, ,, फुसूसुल हिकम्
 (७) सुहरवी कृत अवारिफुल मआरिफ
 (८) मीर दर्द कृत इल्मुल किताब

 सूफी तत्त्वज्ञानाचा विचार केल्यानंतर पुन्हां आपणांस पहिल्या विषयाकडे वळले पाहिजे. चौदाव्या शतकानंतर फारसे मुस्लिम तत्त्वज्ञ निपजले नाहीत. चौदाव्या शतकांत हिलाली, इस्महाना, कुतूबुद्दिन राझी, शिराझी असे तत्त्वज्ञ होऊन गेले. घियासुदिन या नांवाचे तत्त्वज्ञ सोळाव्या शतकाच्या अखेरीस जन्मास आल. त्या नंतर १९ व्या शतकापर्यंत नांव घेण्यासारखी मुस्लिम तत्त्वज्ञ झाला नाही. १९ व्या शतकांत सय्यद जलालुद्दिन अफगाना, शहावलीउल्लाह, सबजावारी, मिझ अबुल हसन आणि शेवटा हिंदुस्थानचे बॅ. सर मोहम्मद इक्बाल हे जन्मास आले. डॉ. इक्बाल न्यांना आशिया खंडाचे मशहूर तत्त्वज्ञ समजले जाते. त्यांचा जन्म