पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१६९



केलाच पाहिजे; प्रेमामुळे मनुष्य सैतानाचे साधूत रूपांतर करूं शकतो; धार्मिक विधीपेक्षां प्रेम व सहृदयता यांमुळे परमेश्वर प्रसन्न होतो असे अनेक उदात्त विचार — मसनवी 'मध्ये विखुरलेले आहेत. मनुष्याला पूर्णत्व येण्याकरितां त्याला निरनिराळ्या अवस्थांमधून जावे लागते या मानवी उत्क्रांतिवादाचा परामर्ष मौलाना रूमी यांनी आपल्या महाकाव्यांत घेतला आहे.

 मसनवी या महाकाव्याच्या खालोखाल 'गुलशने राझ' या काव्याचे महत्त्व असून त्यामध्ये एक हजार श्लोक आहेत. सादुद्दिन मोहम्मद शहाबिस्तरी हे या काव्याचे जनक होत. त्यांचा जन्म इराणमध्ये इ. स. १२५० साली झाला. या काव्यामध्ये सफी तत्त्वज्ञान निवेदिले असून त्याची उर्दू, जर्मन आणि इंग्रजी भाषांतरें झाली आहेत. 'इनसाने कामिल " हा सफी तत्त्वज्ञानावरील महत्त्वाचा ग्रंथ असून त्याची अनेक भाषांतरे झाली आहेत. अब्दुल करीम या नांवाचा तत्त्ववेत्ता या ग्रंथाचा कर्ता असन तो इराणमध्ये इ. स. १३६५ साली जन्मला. वरील ग्रंथांखेरीज त्यांनी आणखी वीस ग्रन्थ सफी तत्त्वज्ञानावर लिहिले आहेत.

 नरुद्दिन जामी या नामांकित सूफी तत्त्वज्ञांचा जन्म इ. स. १४१४ साली खोरासान येथील जाम गांवी झाला. त्यांच्या लेखनाचा पसारा प्रचंड असून अनेक विषयांवर त्यांनी विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिले आहेत. काव्यक्षेत्रांतही त्यांनी बहुमान मिळविला आहे. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे :- (१) नफहातुल उनस (२) अशिअतुल लमआत (३) सिलसिल तुझ् झहब (४) बहारीस्तान (५) नकदुन नुसस (६) लवाइह. त्यांच्या शेवटच्या ग्रंथाची अनेक