पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६८
इस्लाम आणि संस्कृति



सुहरवर्दी, फरीद दिन आतार, नजमुद्दिन राझी, जलालुद्दिन रूमा या पौर्वात्य तत्त्वज्ञान्यांचे समकालीन होते. त्यांनी ३०० ग्रंथ लिहिल असून त्यांपैकी १५० सध्या उपलब्ध आहेत. त्यांचा प्रचंड ग्रंथ ' फुतुहातुल मक्कीया' या नावाने ओळखला जातो. या ग्रंथाची ५६६ प्रकरणे असन त्या ग्रंथास सफी तत्त्वज्ञानाचा ज्ञानकोश अस संबोधिले जाते. 'फुससुल हिकम' या नांवाचा दुसरा मोठा ग्रंथ असून त्याची इंग्लिश व उर्दू भाषेत भाषांतरे झाली आहेत.

 जलालुद्दिन रूमी यांचे नांव माहित नाही असा मनुष्य विरळा. त्यांचा जन्म बल्ख येथे इ. स. १२०७ मध्ये झाला. तथाल राजाच्या जुलुमामुळे त्यांचे वडील बहाउद्दिन यांना देशत्याग करावा लागला. प्रथम इराण, नंतर सीरिया व शेवटी आशिया मायनरमधील कुनिया शहरी ते स्थाईक झाले. जलालुद्दिन याचा धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचा मोठा व्यासंग होता. आपल्या शिष्याच्या आग्रहावरून त्यांनी 'मसनवी' या नांवाचा काव्यग्रंथ सहा विभागांत लिहिला. 'मसनवी' हे एक महाकाव्य समजले जात. त्यामध्ये ४७००० श्लोक असून सफी तत्त्वज्ञानाचा संपूर्ण आविष्कार त्यामध्ये झाला आहे. त्यांनी आपले प्रत्येक विधान उदाहरणे दऊन तें अधिक सुगम केले आहे. परमेश्वराचे वास्तव्य मशिदींत, देवळात किंवा चर्चमध्ये नसून ते शुद्ध अंत:करणांत असते; परमेश्वरावर अढळ निष्ठा ठेवून मनुष्याने कार्य करीत राहावें व फलाची अपक्षा करू नये; अपकृत्य झाले असतां तें परमेश्वरी इच्छेवर न लादता स्वतः मोकळ्या मनाने कबूल करावें; निस्वार्थ वत्ति प्रत्यक्ष आचरणांत आणावी; मनुष्याने स्वत:च्या स्वार्थीकरितां कार्य न करता त परमेश्वराकरितां करावें प्रेम व कृतज्ञता यांचा अवलंब मनुष्याने