पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि तत्वज्ञान

१६७



भाषेमध्ये त्यानेच पहिल्या प्रथम भाषांतर केले आहे. नसीरुद्दिन तूसी या तत्त्वज्ञांचा जन्म इ. स. १२०० साली झाला असून नीतिशास्त्रावरील ' अखलाखे-नसीरी' हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्धि पावला आहे. याशिवाय त्यांनी तत्त्वज्ञान व खगोलशास्त्रावर ५६ ग्रंथ लिहिले आहेत. जलालुदिन दव्वानी हे श्रेष्ठ नीतिशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. 'अखलाखे जलाली' या ग्रंथाने त्यांना विलक्षण प्रसिद्धि मिळवून दिली आहे. 'शरहे हया किल,' 'इसबाते वाजिब,' 'रिसाल ये जौरा' हे त्यांचे ग्रंथ तितक्याच योग्यतेचे समजले जातात. आणखी अनेक मुस्लिम तत्त्वज्ञांनी नीतिशास्त्रावर ग्रंथ लिहिले आहेत.

 सूफी तत्त्वज्ञान हा मुस्लिम तत्त्वज्ञानाचा एक भाग समजला जातो. अकराव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत सूफी तत्त्वज्ञानाचा उत्कर्ष झाला. वरपांगी आचाराविचारापेक्षां चित्तशुद्धीस जास्त महत्त्व आहे; प्रेमाने जगच काय पण प्रत्यक्ष परमेश्वरास देखील मनुष्य जिंक शकतो; अंतःकरण शुद्ध न ठेवितां, कितीही चांगली कृत्ये केली तरी त्या कृत्यांना महत्व प्राप्त होत नाही असे विचार सूफी तत्त्वज्ञानाने प्रसृत केले आहेत. सूफी तत्त्वज्ञानाचा खोल अभ्यास केला म्हणजे सूफी तत्त्वज्ञान व वेदांत यांमध्ये विचारसाम्य आहे असें दिसन येईल. आर्य आणि सेमेटिक आध्यात्मिक विचारांचा परिपाक म्हणजे सूफी तत्त्वज्ञान अशी आपणांस व्याख्या करावी लागेल.

 इन्नुल अरबी या स्पेनमधील मुस्लिम तत्त्वज्ञाने सफी तत्त्वज्ञानाचा मोठ्या हिरीरीने पुरस्कार केला आहे. त्यांचे खास नांव मुहम्मद असें असन, त्यांना 'शेखुल-अकबर' या संज्ञेने सर्वत्र ओळखिलें जाते. त्यांचा जन्म इ. स. ११६५ साली झाला असून ते शहाबुद्दिन