पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६
इस्लाम आणि संस्कृति


यांनी नव्या संस्कृतीला अरिस्टॉटलची ओळख करून दिल्यामुळे सबंध युरोपांत त्यांची कीर्ति विद्यत्वेगानें फैलावली. विख्यात शास्त्रज्ञ रॉजर बेकन म्हणतो, " अरिस्टॉटलने निसर्गाची ओळख जनतेला करून दिली तर इब्न रुश्दनें प्रत्यक्ष अरिस्टॉटलचीच ओळख करून दिली. इस्लामची शिकवण व अरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान यांत विलक्षण मतैक्य आहे हे इब्न रुश्दनें सप्रमाण सिद्ध करून दिले. आध्यात्म आणि मानसशास्त्राच्या अनेक मुद्यांवर त्यांनी अबूअली सीना या तत्त्वज्ञाशी आपला मतभेद प्रदर्शित केला आहे. आपल्या विधानांच्या समर्थनार्थ त्यांनी पवित्र कुराणमधील अनक ऋच्या उद्धृत केल्या आहेत. त्या काळी युरोप खंडांत धामिक दुरभिमान व दांभिकतेचा सुळसुळाट झाला असतां, इब्न रुश्व यांनी निधडेपणानें “बुद्धिरेव सत्यानुतस्य प्रतिष्ठा" या क्राति कारक तत्त्वज्ञानाचा पुकारा केला. बुद्धि आणि श्रद्धा, स्वातंत्र्य अज्ञान यांमधील झगड्याला त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे तोंड लागला बुद्धिवादी क्रांतिकारकांना त्यांच्या तत्त्वज्ञानामुळेच स्फूर्ति झाला. इब्न रुश्द यांच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्व युरोपवर जवळजवळ ५०० वर्षे होता.

 नीतिशास्त्र म्हणजे व्यावहारिक तत्त्वज्ञानाचा (हिकमते अमला एक महत्त्वाचा भाग अशी व्याख्या मुस्लिम तत्त्वज्ञांनी केली आहे. नीतिशास्त्राचे महत्त्व लक्षात घेऊन इब्न सीना व इब्न रुश्द । तत्त्वज्ञांनी नीतिशास्त्रावर स्वतंत्र ग्रंथ लिहिले आहेत. या शास्त्रावर प्रथम लिहिणारा ग्रंथकार म्हणजे अबदुल्ला नांवाचा पंडित हाम: इब्ने मुकाफा या नांवानें तो ओळखला जातो. त्याने 'दहूल यतामा नांवाचा ग्रंथ लिहिला असून 'पंचतंत्र ' या संस्कृत ग्रंथाचे अरबा