पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लामपूर्व जग



यांची शिकवण देणारे, प्राचीन विचार व भावना यांचा लोप झाला होता. संपूर्ण रानटी व तमोयुगाकडे सर्व जग झपाटयाने परतूं लागले होते. सर्व शक्तींचा वापर करून जगास विनाशापासून वांचविणारा आणि संस्कृतीचे रक्षण करणारा कोणी त्राता त्या काळी होता काय ? " स्वतःच विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर त्यां ग्रंथकाराने दिले आहे. तो म्हणतो, “ याच अरब लोकांत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरलेल्या जगांत ऐक्य निर्माण करून, विनाशापासून जगाचे संरक्षण करणारा महान पुरुष-मुहम्मद पैगंबर-निर्माण झाला."