पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि संस्कृति




 स्त्रियांच्या दुर्दैवाचे दशावतार त्या काळी कोठे दिसून येत असतील तर ते अरबस्तानांतच. स्त्रिया या सैतानांच्या सूत्रधार आहेत; स्त्री म्हणजे पुरुषजातीवरील महान संकट; कार्यांत बिघाड व्हावा अशी इच्छा असेल त्याने प्रथम स्त्रीचे तोंड पहावें; अशा कित्येक म्हणी त्या ठिकाणी प्रसृत होत्या. स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तु या पलिकडे तिला कांहीं महत्व नव्हते. स्त्रियांना दर्जा किंवा इज्जत असूच शकत नाही असा अरबांचा दावा होता. एकादी स्त्री सौंदर्यवती असेल तर तिची विटंबना विचारावयास नको, भर रस्त्यांत अशा स्त्रीचा पदर ओढणे, तिला धक्के देणे, तिच्याबद्दल अचकट विचकट उद्गार काढणे हे प्रकार व्हावयाचेच. प्रतिभा हा अरबांचा अभिजात गुण पण त्या प्रतिभेचा उपयोग स्त्रियांबद्दल अश्लिल काव्य करण्यांत होई. एकाद्याला मुलगी झाली की 'शांतं पापं' समजून तिला जिवंत मूठमाती देण्यात येई. आपल्या सावत्र आईशी लग्न लावण्यांत त्यांना काडीमात्र शरम वाटत नसे.
 इतर देशांप्रमाणे अरबस्तानातही गुलामगिरी रूढ होती. गुरां-ढोरांप्रमाणे दावणीत बांधून गुलामांना विकण्याकरितां मोठमोठया शहरी नेण्यांत येत असे. गुलाम स्त्रियांना विकत घेऊन त्यांच्या शरीर-विक्रयावर अरब लोक पैसे मिळवीत. तेथील कुंटणखान्यांत प्रामुख्याने अशाच स्त्रियांचा विशेष भरणा असे.
 वरील विवेचनावरून त्या काळी सर्व जगाचा कसा अधःपात झाला होता याची आपणांस सर्व साधारण कल्पना येईल. डेनिसन नांवाचा विस्व्यात तत्त्वज्ञ आपल्या Emotion as the Basis of Civilization या आपल्या ग्रंथांत म्हणतो, "पांचव्या व सहाव्या शतकांत सर्व जग अधःपाताच्या कक्षेत गेले होते. प्रेम, आदर