पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि तत्त्वज्ञान

१६५




यांच्याशिवाय मिळणे शक्य नाही असा त्यांचा आग्रह होता.।। विषयाचे विवरण संशयातीत झाल्याखेरीज तें ज्ञानाच्या कसोटीला उतरत नाही अशी त्यांची विचारसरणी होती; आणि ही विचारसरणी डेस्कार्टीसच्या कितीतरी वर्षे आधी त्यांनी जगापुढे मांडली. त्या काळी अल-गज्झालीचें हें चिकित्सावादी तत्त्वज्ञान सर्वत्र अभ्यासले जात होते. अल-गइझालीच्या योग्यतेबद्दल सुप्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ रेनॉन म्हणतो, "आधनिक चिकित्सांवादाचा जनक हयम याने देखील अल-गज्झालीपेक्षा अधिक कांहींच सांगितले नाही. निव्वळ अनुमानाने विचार करण्याची जी पध्दत आहे, त्या पद्धतीच्या मुळावर घाव घालणारी कॅटची विचारसरणी हयमच्या चिकित्सावादांतूनच स्फुरली होती हे ध्यानी घेतलें म्हणजे हयमच्या पूर्वी ७०० वर्षे होऊन गेलेल्या अल-गज्झालींचें ऐतिहासिक महत्त्व तात्काळ पटण्यासारखे आहे."

 पाश्चात्य देशांतील शेवटचे महान मुस्लिम तत्त्वज्ञ म्हणजे इन्न रुश्द हे होत. युरोपमध्ये ते Averroes या नावाने प्रसिद्ध आहेत. यांचा जन्म कोडोवा येथे इ. स. ११२६ साली झाला आणि इ. स. ११९८ साली त्यांचे देहावसान झाले. तत्त्वज्ञानाखेरीज घर्मशास्त्र, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र इत्यादि शास्त्रांमन्ये त्यांनी विलक्षण पारंगतता मिळविली आहे. वरील विषयांवर लिहिलेले त्यांचे ग्रंथ श्रेष्ठ दर्जाचे मानले जातात. 'मबादि उल फिलसफा' हा त्यांचा तत्त्वज्ञानावरील महत्त्वाचा ग्रंथ असून त्याचे १२ भाग आहेत. या ग्रंथाखेरीज आणखी २५ ग्रंथ तत्त्वज्ञानावर त्यांनी लिहिले असून तत्त्वज्ञानाच्या अंगोपांगांची त्यामध्ये विस्तृत चर्चा केली आहे. अरिस्टॉटलवर लिहिलेला त्यांचा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. इब्न रुझ्द