पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि तत्त्वज्ञान

१६३



 मुस्लिम तत्त्वज्ञानाचे सुवर्णयुग म्हणजे दहाव्या आणि चौदाव्या शतकांमधील काळ होय. अकराव्या व बाराव्या शतकांत अबू रयहान, अल बरूनी यांच्यासारखे विख्यात तत्वज्ञ झाले. त्यानंतर इब्न मालिका, जमखशरी, उमरखय्याम, इमाम गज्झाली, नझीर खुस्त्रो, इबने बाजा, रब्न तुफेल, शहाबुद्दिन सुहरवर्दि, इब्न रुश्द यांच्यासारख्या तत्त्वज्ञांनी जगाच्या इतिहासांत आपले नांव चिरंजीव केले आहे.

 अबू बक्र इबने बाजा (Avempace) नांवाचे शास्त्रज्ञ स्पेनमध्ये इ. स. ११३८ साली कालवश झाले. त्यांनी अरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानावर लिहिलेले टीकाग्रंथ विद्वत्तापूर्ण समजले जातात. अल फराबी व यांच्या तत्त्वज्ञानांत बराच फरक आहे. पारमार्थिकता साध्य. करण्याकरितां मनन व तन्मयावस्था यांची आवश्यकता आहे असें अल गज्झाली यांनी प्रतिपादिले आहे; वरील साध्याकरितां संन्यस्त वत्ति हाच एक मार्ग आहे असा इब्न बाजा यांचा आग्रह आहे. दसरें तत्त्वज्ञ इब्न तुफेल हे स्पेन देशांत इ. स. ११०० सालीं जन्मास आले व इ. स. ११८५ साली मोरोकोमध्ये त्यांचे देहवसान झाले. त्यांची तत्त्वज्ञ म्हणून कीर्ति आहेच; पण गणिती आणि कवी म्हणन सर्व जग त्यांना ओळखते. तत्त्वज्ञानावर लिहिलेला त्यांचा अमूल्य ग्रंथ है बिन एकजान' या नावाने प्रसिद्ध आहे.

 शहाबुद्दिन सुहरवर्दी या तत्त्वज्ञाचा जन्म इ. स. ११५३ साली झाला. इराणमध्ये त्यांचा अभ्यास आटोपल्यानंतर इजिप्त व सिरियाचे सुलतान सलाहुद्दीन यांच्या विद्याप्रेमी चिरंजिवांनी त्यांना आपल्या पदरी ठेविलें. तत्त्वज्ञानावर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. स्वतंत्र