पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६२
इस्लाम आणि संस्कृति


गणितशास्त्राचे शिक्षण घेतले. अल-फरावी हे युरोपमध्ये Alpharabius या नांवानें ख्यात आहेत.

 अबू अली सीना ( Avicenna ) या नामांकित शास्त्रज्ञाचा जन्म बुग्वाऱ्याजवळील एका खेड्यांत इ. स. ९८० साली झाला. अबु अबदुल्ला नांवाच्या पंडिताजवळ त्यांनी तर्कशास्त्र, गणितशास्त्र क खगोलशास्त्राचा अभ्यास केला. वयाच्या १७ व्या वर्षीच त्यांना आपलें अध्ययन पुरे केलें. एकविसाव्या वर्षी वैद्यक व तत्त्वज्ञान यांवर ग्रंथ लिहीण्यास सुरुवात केली. त्यांच्या असामान्य विद्वत्तेमळे हमदाद इस्पहान दरबारी त्यांना मानाची जागा मिळाली; पण त्याच्या स्वतंत्र मतप्रणालीमुळे तेथे त्यांचे जीवित सदैव घोक्यांत अस. वैद्यक व तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांत तर त्यांचा हात धरणारा दुसरा काण नव्हता. या दोन्ही विषयांवरील त्यांचे ग्रंथ कित्येक शतकें युरोपातील शिक्षणकेंद्रांत अभ्यासले जात होते. पर्शियन व अरबा भाषेत त्यांनी ग्रंथनिर्मिती केली आहे. पर्शियन भाषेमधील दानिश नामा आणि अरबी भाषेतील ऐनल हिकमत हे ग्रंथ श्रेष्ठ दजाच समजले जातात. अरबी भाषेमधील वरील ग्रंथ दहा भागांत प्रसिद्ध करण्यांत आला आहे. बेहमन यार, अबुल मामून इस्पहानी, अबुल अब्बास आणि इब्न ताहेर हे प्रसिद्ध मुस्लिम तत्त्वज्ञ त्यांचे शि होते. या शिष्यवर्गाने त्यांच्या तत्त्वज्ञानाची प्रथा पुढे चालू केली.

 आपल्या उतारवयांत त्यांनी आपली चीजवस्तु विकून टाकून तो पैसा गीरगरिबांस वांटन टाकला. प्रत्येक दिवशी ते कुराण वाचन करीत. आपल्या वयाच्या ५७ व्या वर्षी रमजान माहत्य ते हमदाद येथे कालवश झाले. या तत्त्वज्ञाच्या कबरीस भेट दया करितां जगांतील नामवंत तत्त्वज्ञ हमदाद येथे येत असतात.