पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि तत्त्वज्ञान

१६१


त्या वेळी त्यांची इतकी विपन्नावस्था होती की त्यांना सार्वजनिक बागेतील कंदिलाच्या प्रकाशांत वाचन करावे लागे. उदरनिर्वाहाकरितां त्यांनी रखवालदाराची नोकरी पत्करली. एक दिवस तेथील राजपुत्राच्या मुला वतीचा योग प्राप्त झाला. अल-फराबी यांची असामान्य विद्वता पाहून त्यांना दररोज ४ दिनार देण्याचा राजपुत्राने हुकूम केला. या मर्यादित उत्पन्नावर संतुष्ट होऊन आपल्या आवडत्या विषयाचा अभ्यास व लेखन करीत त्यांनी आपले उर्वरित आयुष्य घालवि. त्यांनी शंभरावर ग्रंथ लिहिले असून त्यांपैकी पन्नासहून अधिक निरनिराळ्या तत्त्वज्ञांचा परामर्ष घेणारे आहेत. तत्त्वज्ञानाच्या सर्व अंगोपांगावर त्यांचे एवढें प्रभुत्व होते की त्यांना 'दुसरे अरिस्टॉटल ' अशी मानाची संज्ञा देण्यात आली होती.

 प्रथम अत्यंत सात्विक वत्तीचे मुस्लिम व नंतर विख्यात तत्त्वज्ञ अशी त्यांची भूमिका होती. प्लेटो व अरिस्टॉटलचा वैचारिक सांप्रदाय व इस्लापची शिकवण यांमध्ये एकवाक्यता आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. प्लेटो व अरिस्टॉटल यांच्या तत्त्वज्ञानामध्ये फरक असला तरी त्याचा मतितार्थ एकच आहे असा त्यांचा दावा होता. आध्यात्माकडे त्यांचा विशेष ओढा असल्यामुळे, त्याग विषयावर त्यांनी लिहिलेले ग्रंथ आधारभूत मानले जातात. तर्कशास्त्राचाही त्यांचा अभ्यास मोठा होता. कारा डी होक्स या विद्वानाच्या मतें अल-फराबींच्या तर्कशास्त्राचा, युरोपियन तर्कशास्त्रावर कायमचा ठसा उमटला आहे. याशिवाय सूफी तत्त्वज्ञानाचा आविष्कार करणारे अल-फराबी हे पहिले तत्त्वज्ञ होत. वैद्यक व गणितशास्त्रांतही ते निष्णात होते. त्यांच्यापासून रॉजर बेकन यांनी

इ.सं.११