पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४
इस्लाम आणि संस्कृति



आढळून येतील. आपल्या मुलाच्या पाठीवर कोरडे मारणारे हजरत उमर यांचे उदाहरण आपल्या समोर आहेच. सुलतान महमूद यांचे उदाहरणही आदर्श व रोमांचकारक आहे. एका शहरांत त्यांच्या सैन्याचा तळ पडला असता, त्या शहरांतील एका मुस्लिमेतर नागरिकानें सुलतानाजवळ आपली फिर्याद गुदरली. तो म्हणाला, " शहेनशहा, राजघराण्यातील एक तरुण दररोज रात्री माझ्या घरांत शिरतो व माझ्या तरुण मुलीची बेअदबी करतो. मला या बाबतींत न्याय मिळावा एवढीच माझी मागणी आहे." ही हकीकत ऐकतांच सुलतान महमूद क्रद्ध झाले. त्यांच्या सैन्याबरोबर राजघराण्यांतील दुसरा तिसरा कोणी पुरुष नसून त्यांचा स्वतःचा मुलगा होता. आपल्या मुलाने असें नीच कृत्य करावें याबद्दल त्याना विषाद वाटला. त्यांनी त्या फिर्यादीस पुन्हा: तो तरुण आल्या. बरोबर वर्दी दे, असे सांगितले. तिसऱ्या दिवशी फिर्यादीने वदा दिल्याबरोबर सुलतान महमूद यांनी आपली तलवार घेतली व तडका त्या फिर्यादीच्या घरी प्रयाण केले. तो तरुण त्या गृहस्थाच्या घर झोपला होता. सुलतान महमूद यांनी त्या खोलीतला | मालविण्यास सांगितले. दिवा मालविण्यांत आल्यावर सुलतान त्या तरुणास जागें केलें व तलवारीच्या एका फटकायासरशी त्या डोके उडविले. दिवा लागल्यानंतर' सलतानांनी त्या तरुणा पाहिले व गुडघे टेकून परमेश्वराची अनन्यभावाने प्रार्थना केली. ती बिचारा फिर्यादी हा सारा प्रकार पाहून भांबावून गेला. सुलता म्हणाले, " तुला मी दिवा मालविण्यास सांगितले, तें एवढयाकरिता की उजेडात माझ्या मुलाचे तोंड पाहिल्यावर माझें पितृप्रेम जागृत होऊन, माझ्या कर्तव्यापासून परावृत्त होईन अशी मला भारत