पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१३९


करण्याचा प्रयत्न केला जातो. कोणीकडून तरी त्यांचा उत्कर्ष होऊ नये हीच त्यांची मनीषा असते. याविषयी History of the World या ग्रंथांत जो उल्लेख आढळतो, तो मननीय आहे. “आपल्या धर्माच्या निष्ठेनें भारावन जाऊन मुस्लिमांनी परधर्मियांचे संपत्ति मिळविण्याचे मार्ग कधीही बंद करून टाकले नाहीत हे अत्यंत स्पष्ट सत्य आहे."

 परधर्मीय नागरिकांशी हमरीतुमरी न करता किंवा त्यांच्याविषयी द्वेष न बाळगतां त्यांच्याशी सभ्यपणाचें व अदबीचे वर्तन करण्याबद्दल सरकारी नोकरांना सक्त हुकूम देण्यांत येत. जनतेचे स्वास्थ्य पाहणे व त्यांच्या गैरसोयी दूर करणे हे सरकारी नोकरांचे काम असते. त्यांनी दुसऱ्या कोणत्याही उचापती न करता आपले कर्तव्य नीट बजाविले पाहिजे. जनता म्हटली की तिच्यांत सर्वधर्मीय लोक आले. त्या सर्वांची सेवा करणे हे नोकरांचे काम आहे असा दंडक घालण्यांत आला होता. हजरत उमर यांच्या अमदानींत एका मुस्लिम अधिकाऱ्याने ख्रिश्चन लोकांशी उद्धटपणे वर्तन केले म्हणून त्याबद्दल त्याला राजीनामा देण्यास खलिफांनी भाग पाडले. राज्यामधील परधर्मियांना किती सहृदयतेने वागविले पाहिजे याचा उल्लेख किताबुल खिराजमध्ये (खंड २ पृ. ७७) आढळून येतो. तो उल्लेख असा :-

 "लक्षात ठेवा !: जो परधर्मीय प्रजाजनांवर अन्याय करतो, किंवा त्याला दिलेल्या कराराचा भंग करतो, किंवा त्याला असह्य होईल असा त्याच्यावर जुलूम करतो, अथवा त्याच्या संमतीवांचून