पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४०
इस्लाम आणि संस्कृति



 एकादी वस्तु काढून घेतो त्याच्याविरुद्ध पुनरुथ्थाना दिवशी मी माझी फिर्याद दाखल करीन."

-हजरत मुहम्मद पैगंबर


 हजरत पैगंबरांना परधर्मीय नागरिकांबद्दल किती सहानुभूती वाटत होती हैं त्यांच्या वरील वक्तव्यावरून दिसून येते. हजरत पैगंबरांनी सहानुभूतीचा किंवा सहिष्णुतेचा नुसता उपदेशच कला नाही तर ती सहिष्णुता प्रत्यक्ष अमलांत आणून दाखविली. मदिनच सर्वाधिकारी झाल्यानंतर व सर्व राज्यसूत्रे हाती आल्यानंतर त्यांना एक खास सरकारी फर्मान काढन परधर्मियांना अभय दिले आह. त्या फर्मानांतील कलमें अशी :-

 (१) जो कोणी आमचा नागरिक या जाहीरनाम्याचे उल्लंघन करील तो विश्वासघातकी ठरून परमेश्वराचे वचन मोडल्याचे पाप त्याच्या पदरी पडेल. जाहीरनाम्याचे उल्लंघन करणारा मग तो राजा असो, रस्त्यांतील भिकारी असो वा कोणीही असो, तो शिक्षेस पात्र होईल.

 (२) ख्रिश्चन लोकांचे धर्मगुरु यांना प्रवास करतांना एकाद्या पर्वतावर अगर खेड्यामध्ये अगर प्रार्थनामंदिरांत उतरण्याचा प्रसंग आला तर सर्व ठिकाणी मी आहे असे समजून त्यांच्या मालमत्तेचे व त्यांचे संरक्षण केले पाहिजे. कारण ते माझ नागरिक आहेत याबद्दल मला अभिमान वाटतो.

 (३) मी सर्व अंमलदारांस हुकूम करतों की त्यांनी ख्रिश्चन लोकांपासून कर वसूल करूं नये किंवा त्यांचेकडून इतर पैसेही उकळू नयेत.