पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८
इस्लाम आणि संस्कृति



 देश पादाक्रांत केल्यानंतर तेथील प्रजाजनांना सक्तीने आपल्या धर्माची दिक्षा देण्याचा रिवाजच होता; अर्थातच धर्मांतर केले नाही तर त्यांच्या नशीबी मत्यु हा ठेवलेला असे. इस्लामने हा अमानुष पद्धत बदलून टाकली. स्टॅन्ले लेनपूल म्हणतो, " गाथ लोकांनी ज्यू लोकांवर अनन्वित अत्याचार करून त्यांचे सक्तीन धर्मांतर केले हे लक्षांत न घेतां, अरब मस्लिमांनी परधर्मियांना संपूर्ण धर्म के प्रार्थनास्वातंत्र्य दिले." पुढे हाच ग्रंथकार म्हणतो, " आपल्या मुस्लिम राज्यकर्त्यांबद्दल परधर्मियांना केवढे समाधान वाटत होत याचा उत्कृष्ट पुरावा म्हणजे सबंध आठव्या शतकांत एकही धार्मिक बंड झाले नाही हे होय.”

 कित्येक ठिकाणी सक्तीचे धर्मांतर जरी करण्यांत आले नाही तरी परधर्मियांनी जाहीरपणे केलेली घार्मिक निदर्शने किंवा विधा यांवर सक्त बंदी घातलेली दिसून येते. हा एक प्रकारचा अत्याचारच आहे असें इस्लाम समजतो. जाहीर धार्मिक निदर्शने किंवा विधा करण्याचा परधर्मियांचा हक्क त्याने मान्य केला आहे. याविषया जॉन मिल म्हणतो, " मस्लिम अमदानींतील धार्मिक स्वातंत्र्य आणि सहिष्णुता यांचा विचार केला असतां, ख्रिश्चन नागरिकांना तक्रार करावयास जागाच नाही.... चर्चमध्ये घंटा वाजविल्या जातात, क्रॉस आणि चित्रे यांची मिरवणूक काढली जाते आणि धामिक ११ घालून फिरण्याची पूर्ण मुभा आहे." *

 काही ठिकाणी धर्मस्वातंत्र्य असते; पण परधर्मियांचा उत्क पाहवला जात नाही. श्रीमंत परधर्मीय पाहिला की कित्यका कपाळशळ उठतो. पैसे मिळविण्याचे त्यांचे मार्ग गुप्तपणे बद


* The Ottomans in Europe, Page 284.