पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१३५



ठिकाणी कोणताही भेदभाव, पंक्तिप्रपंच दिसन येतां कामा नये. इस्लाममध्ये समता किती प्रकर्षाने दिसून येते याचे विवेचन मागील एका प्रकरणांत येऊन गेले आहे. गरीब-श्रीमंत सोडून द्या. पण मालक व नोकर यांच्यामध्ये समता कशी असते हे आपण पाहिले आहे. पाटणा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करतांना देवी सरोजिनी नायडू ( तारीख १३ आक्टोबर १९१७ इसवी रोजी) म्हणाल्या, “ भिकारी आणि राजा समसमान मानण्याची शिकवण इस्लाम धर्मात आहे. प्रजासत्ताक राज्यघटनेचे बीज या शिकवणीमध्ये आहे." याच समतेवर इस्लामनें राज्यशास्त्र आधारले आहे. सर्वाधिकाऱ्यापासून भिकाऱ्यांपर्यंत सर्वांना सारख्या न्यायाने वागविण्यांत येते. मुस्लिमांना एक कायदा व मुस्लिमेतरांना एक कायदा असा भेद त्या राज्यशास्त्रांत कधीही दिसून येत नाही; मुस्लिमांना खास सवलती आणि परधर्मीयांच्या हक्कांचा संकोच अशी विषमता कधीही दृष्टीस पडत नाही. संख्येच्या जोरावर सर्व हक्क लाटावयाचे, इतरांची कुचंबणा करावयाची याला लोकशाही म्हणतां यावयाचें नाहीं; फार झाले तर बहुसंख्याकांचे राज्य म्हणता येईल. राष्ट्रामध्ये एकादा लहानसा गट असला तरी त्याला ते आपले राज्य आहे असे वाटले पाहिजे. असा विश्वास ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी खरी लोकशाही नांदत असते.

 अशा लोकशाहीत जात, किंबा वशिला याला स्थान नसून मनुष्याची कर्तबगारी व योग्यता यांवरच जास्त भर दिला आहे. अबू मुसा अल अशरी नांवाचे मुस्लिम गृहस्थः एक मोठी सरकारी नोकरी मागण्याकरितां आले असतां हजरत मुहम्मद पैगंबरांनी त्याला दिलेले उत्तर मननीय आहे. ते म्हणाले, " परमेश्वराला