पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६
इस्लाम आणि संस्कृति



स्मरून मी सांगतों की जो गृहस्थ ही जागा मागतो किंवा त्या जागेची अभिलाषा बाळगतो त्याला आम्ही त्या जागेवर कधींच नेमत नाही.”* वशिला, जात किंवा दडपण याचा काडीमात्र विचार न करतां योग्यतेवर नेमणका करण्याची प्रथा त्यांच्या राज्यशास्त्रांत दिसून येते. त्या राज्यशास्त्राचे स्वरूप कसें जातिनिरपेक्ष होते व त्यामध्ये सर्वांना सारखा वाव कसा होता याचे वर्णन डॉ. अब्दुल हमीद काझी यांनी New Humanity" या आपल्या ग्रंथांत केले आहे. ते म्हणतात, “ मानवांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होईल व बंधुतेचे ध्येय प्रत्यक्ष अमलांत येईल असें आदर्श राज्य हजरत पैगंबरांनी प्रस्थापित केले. त्या राज्यांत मस्लिम, ख्रिश्चन व ज्यू लोकांना सारख्या रीतीन वागविले जात होते. त्या राज्यांत नीति आणि राजकारण यांचा संगम झालेला दिसून येईल. नागरिकांच्या आर्थिक गरजांकडे लक्ष देण्यांत येई. अन्न आणि वस्त्र यांच्या अभावी कोणीही नागरिक आढळून येत नसे, राज्याधिकारी आणि इतर यांच्यामध्ये भेदभाव नव्हता. तेथील पुढारी आपल्या अनुयायांप्रमाणेच साध्या रीतीन रहात. सर्वजण एकमेकांकडे समतेच्या भावनेने पहात व सर्वांच्या कल्याणाकरितां सारखेच झटत...... मस्लिम व मस्लिमेतर याना सारखेच आर्थिक व राजकीय हक्क होते. ते दोघेही राष्टाच्या संरक्षणाथ भाग घेत. मुस्लिमेतरांना मतस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य देण्यांत आल्यामुळे ते संपूर्ण सांस्कृतिक स्वातंत्र्य उपभोगीत. आपल्या धर्मसांप्रदायाप्रमाणे ते परमेश्वराची प्रार्थना करात. ज्याप्रमाणे मशिदीचे संरक्षण करण्यांत येई, त्याप्रमाणे परधर्माय


* (Al-Bukhari & Muslim on the Authority of Abu Mūsā.)