पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१३३



होऊ नये म्हणून इस्लामने फार खबरदारी घेतली आहे. त्याकरितां खलिफा हजरत उमर यांच्या कारकीर्दीत 'दिवान ' नांवाचें स्वतंत्र खाते उघडण्यांत आले. तत्संबंधी लिहितांना एक मुस्लिम पंडित म्हणतो, " ठराविक मुदतीनंतर खानेसुमारी करून त्या खानेसुमारीच्या आधारावर (१) विधवा व अनाथ मुलें (२) हजरत पैगंबरांच्या वेळी लढाईत निकामी झालेले अपंग (३) आजारी, लुलेपांगळे व वृद्ध नागरिक यांना वार्षिक तनखा देण्याकरितां 'दिवान' नावाचे एक खास खातें हजरत उमर यांनी सुरू केले. या योजनेनुसार प्रत्येकास कमीत कमी २५० दिनारांचा तनखा मिळत असे. नुक्त्याच जन्मलेल्या बालकांना त्यांच्या आईबापांना मिळणारा तनखा देण्यांत येऊ लागला. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षी हजरत उमर म्हणाले, “परमेश्वराने मला आणखी आयुष्य दिलें तर सना पर्वतासारख्या निर्जन स्थळी राहणाऱ्या एकाकी धनगरासही तनखा मिळेल अशी मी पराकाष्ठा करीन."* याही पुढें जाऊन, हजरत उमर यांनी आणखी एक अभिनव उपक्रम केला असें वरील ग्रंथांत ( पृष्ठ २१९-२०) नमूद केले आहे. प्रत्येक मनुष्यास त्याचे आरोग्य आणि ताकद टिकविण्याकरितां साधारणपणे किती अन्न लागते हे अजमावण्यासाठी त्यांनी तीस लोकांवर प्रयोग करून पाहिला. त्यानंतर त्यांनी एक खास निवेदन काढन तितकें अन्न प्रत्येकास सरकारकडून देणेत यावे असा हुकूम केला. आपल्या राष्ट्रांमधील दारिद्रय व उपासमार नाहींशी व्हावी म्हणन इस्लामने राज्यकर्त्यांस जे प्रयोग करावयास प्रवृत्त केले आहे ते आजच्या काळांतही उद्बोधक वाटतील.


*See Ibn Sa'd Vol. III, P. 213-17.