पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०
इस्लाम आणि संस्कृति



जमीन सक्तीने काढून घ्यावी आणि गरज लोकांना वाटून टाकावी हा इस्लामी दंडक हजरत उमर यांनी बिलाल बिन हरिस मंझी याच्या बाबतींत अमलांत आणून दाखविला.
 जनतेच्या उपजीविकेस आवश्यक असणारे जिन्नस योग्य भावाने विकले पाहिजेत अशी सक्ति करण्यांत आली आहे. वाजवीपेक्षा भरमसाट फायदा घेऊन लोकांच्या आर्थिक परिस्थितीस अधिक ताण देणे हा गुन्हा समजण्यांत येतो. गरीब जनतेला पिळून पैसा मिळविणे हे पाप आहे असे प्रत्येकानें समजले पाहिजे. या बाबतीत हजरत पैगंबरांनी काढलेले उद्गार अत्यंत मननीय आहेत.
 " जो स्वस्त दरांत विकत घेतो व स्वस्त दरांत विकतो त्याला मोठ्या फायद्याचे श्रेय मिळते आणि जो जिन्नस विकत घेऊन त्याचा सांठा करतो आणि जास्त भावाने विकतो त्याच्यावर परमेश्वराचा कोप होतो."

-हजरत मुहम्मद पैगंबर


 इस्लामनें सांठेबाजांना दिलेला इशारा मनन करण्यासारखा आहे. स्वस्त दराने माल घेऊन तो सांठवून ठेवणारा आणि माल भरमसाळ भावाने विकणारा मनुष्य मानवजातीचा शत्र समजला पाहिजे. अक्ष रीतीने मानवांना छळणारावर परमेश्वर कधीही प्रसन्न होत नाही त्याचप्रमाणे जनतेच्या कल्याणाकरितां आपली संपत्ति खर्च न करता ती सांठवून ठेवणारा तितकाच दोषी समजला जातो.
 " जो सोने व चांदीचा सांठा करून ठेवतो आणि अल्लाच्या कार्याकरितां खर्च करीत नाही त्यांना जबर हाल भोगावे लागतील असे जाहीर करा."

-पवित्र कुराण ९:३४.