पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र



त्यामुळे खाजगी व्यक्तींना मोठमोठया इस्टेटी करण्याचा मार्ग बंद झाला आणि अशा रीतीने लहान लहान शेतकऱ्यांना आपला उत्कर्ष करून घेण्यास चांगली संधी मिळाली." +

 एकाद्या व्यक्तीकडे त्याच्या गरजेपेक्षा जास्त जमीनजुमला ठेवण्यास सक्त मनाई करण्यांत आली आहे. तसेच शेतकऱ्यांनी मरेपर्यंत राबावे आणि शेतींचा फायदा एकटया मालकाने लाटावा ही विषमता आपणांस इस्लाममध्ये दिसून येणार नाही. जो जमीन कसतो, रात्रंदिवस हाडाची काडे करतो त्याला व त्याच्या कच्चाबच्चांना पोटभर अन्न किंवा अंग झाकण्यापुरता कपडाही मिळू नये हा धडधडीत अन्याय आहे असा इस्लामचा दावा आहे. जमिनीच्या मालकाला त्याला स्वतःला कसतां येईल तेवढीच जमीन आपल्या मालकीची म्हणून ठेवता येईल. दुसऱ्यांना जमीन कसावयास देऊन त्यावर घर बसल्या वाटेल तेवढा पैसा मिळविण्याचा त्याला हक्क नाही. हजरत पैगंबरांच्या सहवासांत असणाऱ्या अनेकांनी आपल्या जमिनी दुसऱ्यास कसावयास दिल्या होत्या; पण नंतर इस्लामच्या तत्त्वानुसार त्यांनी ती पद्धत बंद केली. अबदुल्ला बिन उमर नांवाच्या श्रीमंत जमीनदाराने आपल्यापुरती आवश्यक तेवढी जमीन ठेवून बाकीची जमीन त्याने जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना बहाल करून टाकली. हजरत पैगंबर एकदां म्हणाले, "तुमच्यापैकी जो जमिनीचा मालक असेल त्याने ती जमीन स्वतः कसावी किंवा विनावेतन दुसऱ्याला कसावयास देऊन टाकावी." आपली नैतिक जबाबदारी ओळखण्याचे जमिनीच्या मालकांनी टाळले आणि सबंध जमीन आपल्याकडेच ठेवण्याचा अट्टाहास केला तर त्याच्याजवळून सरकारने ती


+ Historians' History of the World, Vol. 8, Page 323.
इ.सं.९