पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८
इस्लाम आणि संस्कृति



जातीबद्दल वाटणाऱ्या प्रेमामुळे आपल्यामध्ये त्या प्रेमास पोषक होणारे सद्गुण वाढीस लागतात. स्वतःच्या स्वार्थापेक्षा किंवा सौख्यापेक्षां मानवांचे कल्याण हेच श्रेष्ठ आहे अशी भावना आपल्या अंत:करणावर संक्रांत होते. दुसरा उद्देश हा की, आपल्या जकातीच्या पैशापासून गोरगरीब, अनाथ, अपंग किंवा विधवा यांना जें साहाय्य मिळते त्यामुळे त्यांना भीक मागण्याचा किंवा आपला स्वाभिमान गमावण्याचा संभव नष्ट होतो. भांडवलशाहीचा संकोच करणारा तिसरा उपाय म्हणजे व्याजबड्याचा व्यवहार बेकायदेशीर, निषिद्ध मानण्यांत आला आहे. गोरगरिबांना पिळून काढणाऱ्या या सामाजिक दोषांपासून समाजाला इस्लामने कायमचे मुक्त केले आहे. वेळ निभावून नेण्याकरितां काढलेल्या ऋणाची दामदुपटीने किंवा चौपटीने फड करावी ही गोष्ट अन्यायाची आहे असें इस्लाम समजतो. व्याज घेणारा मनुष्य इस्लाममध्ये अत्यंत हीन व तत्त्वभ्रष्ट समजला जातो. या उपायामुळे संपत्तीची भमितिश्रेढीने होणारी वाढ कायमची खुंटली गेली. त्याचप्रमाणे सर्वांची नागवणक करून एकालाच श्रीमंत करणारा 'जुगार ' इस्लाममध्ये निषिद्ध मानण्यांत आला आहे. जुगार किंवा शर्यत खेळणे हे परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध आहे असा आदेश देण्यात आला आहे.

 निरनिराळ्या कराच्या रूपाने जमणारी संपत्ति समाजाच्या कार्याकरितां खर्चावयाची असते. उशर, खिराज, जझिया, सदाकत अस महत्त्वाचे कर राज्यशास्त्रांत प्रचलित होते. खासगी मोठी इस्टट किंवा जमीनजुमला ठेवण्यास इस्लामनें मनाई केली आहे. या बाबतीत एका प्रसिद्ध इतिहासकाराने काढलेले उद्गगार मननीय आहेत. तो म्हणतो, "अरबांना लोकशाहीबद्दल वाटणारा जो आवेश होता,