पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
इस्लाम आणि संस्कृति



अनाथ स्त्री व तिची दोन मुले आसन्नमरण झाली होती. हजरत उमर यांनी तें हृदयद्रावक दृश्य पाहिल्यानंतर शहरांतून पीठ व खजूर आणण्याकरितां आपल्या नोकरास पाठविलें. जिन्नस आणल्यानंतर ते स्वतः चुलीजवळ बसले; स्वयंपाक तयार झाल्यानंतर त्यांना प्रेमाने स्वावयास घालून त्या अनाथांची उदरनिर्वाहांची कायमची व्यवस्था हजरत उमरनी सरकारी खजिन्यामधून केली.

 राज्यशास्त्रांत आर्थिक सुस्थितीला महत्त्वाचे स्थान आहे. राष्ट्रामध्ये आर्थिक व्यवस्था व पारीस्थति चोख राहावी हे तेथील राज्यशास्त्रास केव्हाही भूषणास्पदच आहे; पण याच्या उलट परिस्थिति असेल तर मात्र तें राज्यशास्त्र कोठेतरी चुकत असले पाहिजे किंवा त्यामध्ये मुळांतच काही दोष राहिला असला पाहिजे असा निष्कर्ष निघतो. देशामध्ये अगदी मोजक्या लोकांजवळ पैशाचा ढीग पडून राहावा आणि सर्वसाधारण जनतेची कंगाल अवस्था असावी, श्रीम. तांनी लहर किंवा व्यसनाखातर पाण्यासारखा पैसा खर्च करावा आणि गरिबांजवळ त्यांच्या आवश्यक गरजा भागविण्याकरितां एक कपर्दिकाही नसावी ही गोष्ट खचित भूषणावह नाही. राष्ट्रांतील संपत्तीची विषम वांटणी हा त्या राष्ट्राला शाप आहे असें इस्लाम समजतो. राष्ट्रामध्ये भांडवलशाहीचे प्रस्थ वाढू नये आणि शक्य तितकी आर्थिक समता राहावी अशी परिस्थिति राज्यशास्त्राने निर्माण केली पाहिजे. 'परमेश्वर एक आहे' या विश्वासामुळे आर्थिक समतेचा प्रश्न हाताळावयास फार मोठी मदत होते. आपण सर्व एकाच कुटुंबांतील असून एकमेकांच्या स्वास्थ्याचा विचार करणे हे आपले कर्तव्य आहे. या विचारसरणीचा पगडा मनावर असल्यामळे आर्थिक परिस्थिति चिधळण्याच्या अवस्थेपर्यंत जात नाही. श्रीमंत कोणी परके