पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१२५




असे. तें कार्यकारी मंडळ " अरबाबे हल व अक्द" या नांवाने ओळखले जाई. राज्यकारभाराचे दैनंदिन प्रश्न हाताळण्याचे कार्य या कार्यकारी मंडळाच्या साहाय्याने करण्यांत येई.

 अल-मवी नांवाच्या विख्यात ग्रंथकाराने आपल्या 'अहकामुत्सलतानिया' या राजकीय ग्रंथांत राज्यशास्त्राची साद्यंत व हृद्य हकीकत दिली असून, खलिफा होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या अंगीं कोणते गुण लागतात, निवडणुकी कशा कराव्या, लोकमंत्र्यांचे अधिकार कोणते, सर्वाधिकाऱ्याचे अधिकार क्षेत्र किती इत्यादि गोष्टींचा संपूर्ण उहापोह केला आहे. या ग्रंथांत राज्यशास्त्र हे लोकांचे हित व कल्याणाकरितां असले पाहिजे, इस्लामचे क्षेत्र मानवजातीस व्यापून टाकणारे असल्यामुळे सर्व मानवांमध्ये समता व स्वास्थ्य कायम राहील असा कटाक्ष राज्यशास्त्राने ठेविला पाहिजे वगैरे गोष्टींचे सविस्तर विवरण करण्यांत आले आहे.
 राज्यशास्त्रांत खलिफाची जबाबदारी मोठी समजली जाते आणि त्याकरितां त्याची निवड करतांना अनेक महत्त्वाच्या गोष्टी विचारांत घ्याव्या लागतात. खलिफा हा सर्वाधिकारी म्हणूनच नव्हे तर तो आदर्श नागरिक म्हणून ओळखला जातो. त्याच्या दैनंदिन व्यवहारांत लोक बोध घेतील अशा प्रकारचे आचरण त्याला ठेवावें लागते. मोठेपणा, बडेजाव किंवा सत्तेचा मद यांपासून त्याला सदैव अलिप्त राहावे लागते. या दृष्टीने इस्लामच्या इतिहासात पहिल्या चार खलिफांची चरित्रे अभ्यासण्यासारखी आहेत. इब्न जौजी यानें। 'शिरतुन् लिल उमर' या आपल्या ग्रंथांत खलिफा हा जनतेचा सेवक कसा असतो याचे सुंदर चित्र रंगविले आहे. मदिनेहन तीन मैल अंतरावर एका ठिकाणी खावयास कांहीं न मिळाल्यामुळे एक