पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२
इस्लाम आणि संस्कृति


शास्त्र पत्करूं शकत नाही. जनतेच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणे, तिच्या भावना दडपून टाकणे, अन्याय व अत्याचार करून तिला त्राही भगवान् करून सोडणे या गोष्टी राज्यशास्त्राने निषिद्ध मानल्या आहेत. राज्यसूत्रे धारण करणारे पहिले मान्यवंत खलिफा हजरत अबू बक्र यांनी जी प्रथम घोषणा केली ती या दृष्टीन अत्यंत महत्त्वाची आहे. ते म्हणाले, " सज्जनांनो, जे न्याय्य असल तें मी करीन तर मला सहाय्य करा; परंतु माझ्या हातून अयोग्य घडत असेल तर मला सन्मार्गावर आणा. जर परमेश्वराची व पैगंबरांची आज्ञा मी मान्य करीत असेन तर माझ्या आज्ञा तुम्हा पाळा; माझ्या हातून तसे घडत नसेल तर माझ्या आज्ञा पार नका." या वक्तव्यावरून अयोग्य व अन्यायाचा पुरस्कार करणा राज्ययंत्र किंवा शासनपद्धति इस्लामला मान्य नाही हे सिद्ध होत.
 "तुमच्या मागून खऱ्या न्यायाला आवाहन करणारे, योग्य मार्गाचा अवलंब करणारे आणि अयोग्य मार्गापासून परावृत्त होणार लोक निर्माण होवोत."

-पवित्र कुराण ३:१०३


 राज्यतंत्र चालविणारांपुढें इस्लामने वरील आदर्श ठेविला आहे. वाटेल त्या अयोग्य मार्गाचा अवलंब करून, न्यायाची गळचेपी करू, राज्यतंत्र चालविणे इस्लाम कधीही मान्य करीत नाही. राजशाह असो वा लोकशाही असो, त्यांच्या राज्यपद्धतींत पवित्र कुराण वरील आदेशाचे प्रतिबिंब पडलेले असले पाहिजे. प्रसिद्ध पशि कवि सादी याने आपल्या 'बोस्तान' नावाच्या महाकाव्यांत (पा पर्व) राज्यशास्त्र कसे असावे याविषयी कल्पना दिली आहे. त्याम. नौशेरवान आपल्या मुलास म्हणतो, " दुर्बल व अनाथ यांचे