पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१२१



रक्षणासाठी राज्यतंत्राची फार मोठी आवश्यकता आहे. समाजाचे स्वास्थ्य, स्वातंत्र्य आणि कल्याण साधण्याचे श्रेष्ठ कार्य राज्यतंत्रा· कडून होत असते. नुसता धर्म उराशी बाळगून भागत नाही किंवा समाजसुधारणेचे कार्य झाले की कार्यभाग झाला असे समजून चालणार नाही. धर्म किंवा समाज टिकणे हे सर्वस्वी राज्यतंत्रावर अवलंबून असते. राज्यतंत्र नसेल तर देशामध्ये अशांतता फैलावेल, ज्याच्या मनगटांत जोर तो शिरजोर ठरेल, दर्बलांचा त्राता कोणी राहणार नाही किंवा जनतेचे जीवित आणि वित्त यांचे सरंक्षण होणार नाही.
 लोकांच्या विचाराने, संमतीने निर्माण झालेले राज्यतंत्र श्रेष्ठ दर्जाचे समजले जाते. नुसत्या बलावर राज्यतंत्र निर्माण होऊ शकत नाही आणि झाले तर फार दिवस टिकू शकत नाही. बल हा एक आनुषंगिक भाग आहे. बलापेक्षां जनतेची संमती अधिक महत्त्वाची मानली जाते. जनतेच्या भावना, नैतिक शक्ति आणि संमती हाच राज्यतंत्राचा किंवा राज्यांतील अधिसत्तेचा कणा समजला जातो. हॉब्स, लॉक किंवा रूसो यांच्यासारख्या तत्त्वज्ञांनी वरील विचारसरणींचा पुरस्कार केलेला आहे.

 इस्लामच्या दृष्टीने असें राज्यशास्त्र आवश्यक असले तरी त्या राज्यशास्त्रांत सत्तेचा अभिलाष, वैयक्तिक बडेजाव किंवा निव्वळ बलाची उपासना असता कामा नये असा त्याचा कटाक्ष आहे. राज्यशास्त्राचें । परमेश्वर एक आहे' हे ध्येयवाक्य असले आहे. आदर्श राज्यशास्त्र परमेश्वराची आज्ञा काय आहे याचा प्रथम विचार करते. मानवजातीचे कल्याण हा त्या आज्ञेचा निष्कर्ष असल्यामुळे मानव्याला विघातक होईल असा कोणताही कार्यक्रम तें राज्य-