पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ५वें
इस्लाम आणि राज्यशास्त्र


 “सर्व धमौत, इस्लाम हा लोकसत्ताक राज्यपद्धतीचा पुरस्कार करणारा धर्म आहे. मानव जातीस. पूर्णपणे समतेच्या पातळीबर आणण्याचे श्रेय त्याने घेतले आहे....पॅसिफिक महासागरापासून तो अटलांटिक महासागरापर्यंत इस्लामने जी जागतिक प्रगती केली याचे कारण त्याचे उदार धोरण होय,"*

-सर प्रफुल्लचंद्र रॉय


 धर्म आणि समाजशास्त्र एवढ्यापुरतेच इस्लामचे क्षेत्र मोदित नाही. त्याच्या कक्षेत राज्यशास्त्राचाही प्रामुख्याने अंतर्भाव होता. इस्लामने धार्मिक कल्पनांना नवे वळण लावून दिले, समाजाच्या आचारविचारांत क्रांति करून टाकली आणि राज्यशास्त्रांत अभिनव योजना प्रसृत करून टाकल्या. धर्म, समाज आणि राजकारण का तिन्हींचे अधिष्ठान मात्र एकच आहे आणि ते म्हणजे अद्वैतवाद ह होय. अद्वैतवाद म्हटला की त्या ठिकाणी नैतिक मूल्यांचा आविष्का आलाच. नैतिक मल्यांचे उच्चाटन झाले तर धर्म, समाज आ राजकारणामध्ये विकृती निर्माण होणे अपरिहार्य आहे असें इस्लाम मानतो.

 इस्लाम राज्यशास्त्राचे महत्त्व अत्यावश्यक मानतो. समाजाच्या


*The Glory of Islam, Page 233.
१२०