पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि संस्कृति




जीवित आणि मालमत्ता यांचा एकमेव धनी म्हणजे राजा असा सांप्रदाय चालू असे. त्याच्याइतकाच पुरोहित किंवा धर्मपंडित यांचा बडेजाव होता. त्यांच्याविरुद्ध ब्र काढणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला आव्हान करण्यासारखे होते. एका मान्यवर स्त्रीने तत्त्वज्ञानावर प्रवचन करीत असतां पुरोहितवर्गावर टीका करण्याचे धाडस केलें म्हणून आलेक्झाँडीयाच्या भर रस्त्यावर गाडीतून ओढ़न काढून तिला नग्न करण्यांत आले व तशा अवस्थेत तिच्या उघड्या अंगावर फटक्यांचा मार देण्यांत आला. शेवटी तिला चर्चमध्ये तशीच फरफटत नेऊन मुख्य पुरोहिताच्या धर्मदंडाने ठार मारण्यांत आले. त्यानंतर तिच्या प्रेताची विटंबना करण्यांत येऊन तिचा एकएक अवयव तोडन काढण्यात आला. विख्यात तत्त्वज्ञ डॉ. डेपरने या प्रसंगाचे अत्यंत हृदयविदारक वर्णन केले आहे.|
 कॉन्स्टॅटिनोपलमध्ये हीच अवस्था होती. एक मान्यवर ग्रंथकार लिहितो, " अनन्वित अत्याचार, समाजद्रोह आणि अधःपाताची कृत्ये यामध्ये पुरोहित वर्गाचा सदैव हात असणे हाच जणं कांहीं त्या काळचा दंडक होता. अशा प्रसंगी प्रत्येक कायदा-मग तो मानवी असो वा दैवी असो-पायदळी तुडविला जात असे; ख्रिश्चन देवळे व तेथील व्यासपीठे रक्ताने न्हाऊन निघत; अनाचारापासून एकही स्थळ अलिप्त नव्हतें; सामाजिक बंधनें पार तुटन गेली होती, आणि दिवसाढवळ्या अंगावर रोमांच उभे करणारे अनेक अत्याचार घडत."* यापुढे जाऊन गिबन म्हणतो की 'एखाद्यास शांतपणे मत्यु आला तर ते भाग्याचे लक्षण समजले जात असे;


 † History of the Conflict between Religion & Science,

Page 55.
 * Spirit of Islam, Page 35.