पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लामपूर्व जग




साठी एक आठवडाभर ठेवावयाची रूढी अत्यंत चीड आणण्यासारखी होती. सख्या भाऊबहिणींमध्ये तर सर्रास लग्ने होत.
 ग्रीस एवढा तत्त्वज्ञांचा देश! पण त्याची अत्यंत अवनती झाली होती. तेथील जनता तत्त्वज्ञानाच्या गोष्टी पार विसरून गेली होती. चैन आणि ऐषआराम यांकडे सर्वांचे लक्ष केंद्रीभत झाले होते. लग्नाशिवाय स्त्रियांशी संबंध ठेवणे भषणास्पद मानले जाई. बेताल आचरणामुळे ग्रीक लोकांत भयंकर लैंगिक रोगांचा फैलाव झाला होता; निष्पाप स्त्रियांना त्याची झळ लागणे साहजिक होतें. ग्रीक स्त्रिया जात्याच सौंदर्यवान होत्या; पण त्या सौंदर्याचा लिलाव पुकारला जाई.
 स्पेन देश म्हणजे श्रीमंत सुखासक्तांचे आगर, धनिकांचे मन-सोक्त चैन करण्याचे एकमेव ठिकाण, अशी त्या देशाची ख्याति होती. अन्नपाण्यावांचून तडफडत असलेल्या जनतेचा आर्तस्वर भव्य प्रासादांमध्ये सुंदर स्त्रियांच्या घोळक्यांत रममाण होणाऱ्या श्रीमंतांना कधींच ऐकू जात नसे. गरीब लोकांच्या दु:खावर डागण्या देण्याकरितांच की काय त्यांच्या सुंदर स्त्रियांना जबरदस्तीने अंत:पुरांत खेचून नेण्यांत येई. तेथील धर्मगुरूंनी तर ताळतंत्रच सोडला होता. व्यभिचार करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे ते म्हणत. प्रसिद्ध इतिहासकार गिबन म्हणतो, " हे धर्मगुरु आपण घेतलेली ब्रह्मचर्याची शपथ विसरून अनेक स्त्रियांशी संबंध ठेवीत." गुलामगिरी तर व्यवस्थित चालू होती. भर बाजारांत स्त्रीपुरुषांना उभे करून त्यांना विकण्यांत येई.
 बायझंटाईन साम्राज्यांत तर राजा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आणि त्याचा शब्द म्हणजे बायबलचा शब्द असे समजण्यांत येई. प्रजेचे