पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
इस्लाम आणि संस्कृति


ग्रंथांचा संभार होता. सीरियामधील टीपोली येथील ग्रंथालयांत तीस लाख ग्रंथ होते. स्पेनमधील क्रोडावा येथील ग्रंथसंग्रहालयांत चार लाख ग्रंथांचा संग्रह होता. ही सर्व पुस्तकें एका इमारतीमधून दुसऱ्या इमारतींत हलवावयाची झाल्यास सहा महिने लागत. अल-हकीमच्या स्वतःच्या ग्रंथालयांत ४० दिवाणखाने असून प्रत्येक दिवाणखान्यांत अठरा हजार ग्रंथ संग्रहित करण्यांत आले होते.'+

 ज्या काळी शिक्षणाविषयीं, ज्ञानाविषयी उदासीनता होती अशा मध्ययुगीन काळांत इतका प्रचंड ग्रंथसंभार मुस्लिम राजवटीत ठिक ठिकाणी आढळून यावा, यावरून मुस्लिम खलिफांचा व राज्यकर्त्यांचा सांस्कृतिक दर्जा केवढा श्रेष्ठ असला पाहिजे याची आपणच कल्पना करावी. त्यांच्या औदार्यामुळे जगाच्या ज्ञानांत एवढी प्रचड भर पडली. प्रथितयश विद्वान पंडितांकडून मुद्दाम ग्रंथ लिहवून घेण्या करितां मुस्लिम खलिफा पाण्यासारखा पैसा खर्च करीत. निरनिराळ्या देशांत आपली माणसें पाठवून तेथील विद्वानांस बोलावीत व त्याच्या कड़न ग्रंथलेखनाचे काम करून घेत, या कार्याबद्दल त्यांनाच काय पण त्यांच्या मुलाबाळांना पुरून उरेल इतकें द्रव्यसाहाय्य त्यांना देण्यांत येई. या दृष्टीने बगदादचे खलिफा अल-मामून या चतुर खलिफाचे उदाहरण आदर्शवत नव्हे तर रोमांचकारक आहे. अल-मामून यांना एका संस्कृत ग्रंथाचें अरबी भाषांतर करून घ्यावयाचे होते. त्या काळी काशी हे संस्कृत विद्येचे माहरघर म्हणून प्रसिद्ध होते. तेथील माणिकशास्त्री नांवाच्या संस्कृत पाडतात बगदाद येथे आणण्याकरितां खलिफा अल-मामूननी काशीस खार शिष्टमंडळ पाठवून दिले. इतका विद्वान व जाडा पंडित पण त्याच्या


+ Outline of Islamic Culture, Vol. I, P. 167-68.