पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

११७


प्रस्थापित करण्यांत आली. जगांतील सर्व भागांतून उत्कृष्ट ग्रंथसंभार जमविण्यांत आला, कित्येक ठिकाणी धूळ खात पडलेली मौल्यवान हस्तलिखिते मोठ्या आस्थेने गोळा करण्यांत येऊन त्यांना ग्रंथालयांत स्थान देण्यांत आले. मुस्लिम खलिफांनी व श्रीमानांनी ग्रंथालयांची वाढ होण्याकरितां मुक्त हस्ताने मदत केली. ग्रंथालये म्हणजे ज्ञानाचे जिवंत भांडार असें ते मानीत. मुस्लिम बादशहा तर त्यांना इतके महत्त्व देत की एकदां शत्रंचा पराभव केल्या. नंतर त्यांचा विस्तृत प्रदेश हस्तगत करण्याऐवजी त्यांच्या संग्रहीं असलेले उत्कृष्ट ग्रंथभांडार घेणे हेच त्यांना महत्त्वाचे वाटत असे. फक्त ग्रंथालये हवाली करण्याच्या अटींवर लढाई थांबवून तहनामा करण्यांत आल्याची उदाहरणे पाहिल्यानंतर ग्रंथालयांबद्दल मुस्लिमांच्या किती उच्च भावना होत्या याची आपणांस कल्पना येईल.

 मुस्लिमांच्या कारकीर्दीत ग्रंथालयांचा केवढा पसारा वाढला होता याचे वर्णन त्याच ग्रंथकाराने केले आहे. तो म्हणतो, "इराणचा राजा आझाद उद्दौला याने सिराझ येथे प्रचंड ग्रंथालय प्रस्थापित केलें. असंख्य ग्रंथांखेरीज, सुंदर व बादशाही इमारत, सामानसुमान आणि आदर्श व्यवस्था यांबद्दल तें ग्रंथालय प्रसिद्ध होते. सभोंवार लहान लहान बगीचे असलेल्या त्या इमारतीमध्ये ३८० खोल्या व दिवाणखाने होते. बगदादमध्ये जे ग्रंथालय प्रस्थापित करण्यांत आले, त्यामध्ये एक लक्ष चाळीस हजारपर्यंत मोठमोठे ग्रंथ होते. ....तेहरानजवळ रे शहरामध्ये जे ग्रंथालय होते, त्यामध्ये ४०० उंटांवर लादून नेतां येतील इतके ग्रंथ होते. कायरो येथील ग्रंथालयाचा खर्च दरमहा एक हजार सुवर्ण दिनार होता. बैतुल हिकमत विद्यापीठास जोडून एक प्रचंड ग्रंथालय होते. त्यामध्ये, वीस लाख