पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६
इस्लाम आणि संस्कृति



करीत. जात किंवा धर्म यांचा विचार न करतां विद्वानांचा सत्कार करून त्यांना देणग्या देण्यांत येत. विद्येस भरपूर आश्रय देणे; शास्त्र, तत्त्वज्ञान व धर्मशास्त्र या विषयांवर वाद विवाद करण्याकरिता मुद्दाम विद्वानांना दूर दूर ठिकाणांहून पाचारण करणे, सार्वजनिक ग्रंथालयांकरितां पुस्तकांचा संग्रह जमविणे ही तर राज्यकर्ते,, मंत्रि आणि श्रीमान् लोक यांची नित्याचीच बाब झाली होती. खलिफा अल अजीझ यांनी ईजिप्तमध्ये प्राध्यापक व विद्यार्थी यांना राहण्याकरितां सुंदर व भव्य प्रासाद बांधले होते. त्यांना भरपूर तनखा व शिष्यवृत्त्या देण्यांत येत. सेल्जुक घराण्यांतील निजाम-उल-मुल्कनी तर शैक्षणिक पद्धतींत नमनेदार सधारणा केल्या. त्यांनी अनेक विद्यालये व विद्यापीठे प्रस्थापित करून त्या सर्वांना खास सरकार आश्रय दिला. विद्वान् लोकांची निवड करून त्यांची महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नेमणुका केल्या.....याखेरीज समरकंद, बल्क अल्लेपो, दमास्कस, गझनी इत्यादि मोठया शहरांत महाविद्यालय प्रस्थापित झाली.....स्पेनमधील मुस्लिमांमध्ये तर विद्येची एवढा अभिरुची होती की बादशहापासून तो गरीब नागरिकापर्यंत सन अभ्यासाकरितां एकत्र येत आणि ज्ञानसंपादनार्थ लांब लांब दार काढीत. तेथे सेव्हेली, ग्रानडा आणि क्रोडोवा शहरी महाविद्यालय व ग्रंथालये प्रस्थापित करण्यांत आली....सीरियामध्ये अल-रिसीय्या, अमानिय्या, तर्खनिय्या, खातुनिय्या, आणि शरीफिया ही महाविद्यालये प्रसिद्ध होती. इजिप्तमध्ये रम्बीया, नसरिय्या, सलाहिय्या या विद्यापीठांचें नांव सर्वत्र गाजले होते."

 जनतेच्या ज्ञानार्जनांत भर पडावी म्हणून ठिकठिकाणी ग्रंथालये


+ Outline of Islamic Culture, Vol. I, Page 165-70.