पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४
इस्लाम आणि संस्कृति


सोडावयाची, हिंदुस्थानचा संबध प्रदेश पायांखाली घालावयाचा आणि नंतर हिमालय लगतचा दऱ्याखोऱ्यांचा निर्जन प्रदेश ओलांडून चीनमध्ये प्रवेश करावयाचा म्हणजे केवढे दिव्य आहे याची आपण कल्पना करू शकतो, त्या काळी चीन देशास जाणे म्हणजे मृत्यूला आव्हान करण्यासारखेच होते; पण शिक्षण संपादन करण्याकरिता इतका मोठा धोका पत्करला पाहिजे असा हजरत पैगंबरांनी आदेश दिला आहे.
 "रात्रभर प्रार्थना करीत बसण्यापेक्षां रात्रीचा एक तास दुसऱ्यांना शिकविण्यांत किंवा ज्ञान देण्यांत खर्च केला तर तो अधिक चांगला.”

-हजरत मुहम्मद पैगंबर


 इस्लाम धर्मास ज्ञानार्जनाची केवढी मातब्बरी वाटते हे वरील वाक्यावरून सहज दिसून येणार आहे. रात्रभर प्रार्थना करून मनुष्य थोडेफार पुण्य मिळवू शकेल; पण त्यापेक्षां फक्त एक तासच का होईना लोकांना ज्ञानदान देण्याने मिळालेले पुण्य आधक मोलाचे आहे. ज्ञानदान ही परमेश्वराची भक्तीच समजली जाते.
 “हुतात्म्याच्या रक्तापेक्षां विद्वान माणसाच्या लेखणीतला एक थेंब अधिक पवित्र आहे."

-हजरत मुहम्मद पैगंबर


 हुतात्म्याकडे आपण अत्यंत गौरवपूर्ण दृष्टीने पाहतो, त्याची योग्यता असामान्य आहे असे आपण समजतो. त्याला नरश्रेष्ठ मानन त्याला पुष्पांजलि वाहतो, त्याचे गुणगान करतो. इस्लामच्या दृष्टीने