पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

११३


असा इस्लामचा आग्रह आहे आणि म्हणूनच मनुष्यास सुसंस्कृत बनविणाऱ्या शिक्षणाचा किंवा ज्ञानार्जनाचा इस्लामने हिरीरीने पुरस्कार केला आहे.
 ज्ञानप्राप्ति करून घेणे हे प्रत्येक मुस्लिम स्त्रीपुरुषाचे कर्तव्य आहे.

-हजरत महम्मद पैगंवर


 फक्त पुरुषांनी शिक्षण घ्यावे, ज्ञानार्जन करावे आणि स्त्रियांना स्थापासून अलिप्त ठेवावें असा पंक्तिप्रपंच इस्लाम करीत नाही. पुरुषांप्रमाणे स्त्रियांनीही शिक्षण घेऊन ज्ञानसंपन्न झाले पाहिजे असा त्याचा आग्रह आहे. समाजाची प्रगती व उत्कर्ष दोघांकडून होत असतो. फक्त पुरुषवर्गाने कितीही प्रगती करून घेतली आणि स्त्रियांना अज्ञानांत ठेवले तर समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने त्याचा फारसा उपयोग नाही. समाजाची सर्वांगीण उन्नति व्हावयाची असेल तर स्त्रियांनी ज्ञानार्जन केलेच पाहिजे.

" ज्ञानसंपादन करण्याकरितां चीन देशास जा."


-हजरत मुहम्मद पैगंबर


आपल्या शहरांत किंवा देशांत पुरेसें ज्ञान मिळत नाही म्हणन स्वस्थ न बसतां, ज्या ठिकाणी ज्ञान मिळू शकेल त्या ठिकाणी जाण्यास आपण सिद्ध झाले पाहिजे. आपणांमध्ये ज्ञानाची लालसा इतकी प्रकर्ष पावली पाहिजे की सातासमुद्रापलीकडे जाण्यास आपण तयार झाले पाहिजे. वरील वाक्यांत 'चीन देश' असा शब्द वापरला. त्यांत फार मोठा अर्थ आहे. त्या काळी कोणतीही वहातुकीची साधने नव्हती. मजल दर मजल करीत अरबस्तानची रखरखीत सरहद्द

इ.सं.८