पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२
इस्लाम आणि संस्कृति


बद्दल प्रसिद्धी आहे. स्पेनमधील ग्रानडाचा शेवटचा राजा सुलतान अबदुल्ला यांची पत्नी आयेषा तर अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या वक्तृत्वाबद्दल सबंध युरोपमध्ये प्रसिद्ध होत्या. त्यांच्या मुलाने आपली राजधानी शत्रच्या हवाली केल्यानंतर त्या म्हणाल्या, " नीचा ! अरबांचा वंशज म्हणवून घ्यावयास तूं लायख नाहीस. तुझ्यासारख्या अधमास माझा मलगा म्हणवन घेण्याची मला लाज वाटत. तुझ्या ऐवजी मी एकाद्या फत्तराला जन्म दिला असता तर फार बरे झाले असते. मर्दासारखा छातीचा कोट करून प्रतिकार करण्याच्या वेळी भेकड भागुबाईसारखा अश्रु ढाळतोस ! इस्लामच्या झेंड्याखाली लढण्यास तयार असलेल्यांची मदत तुला मागतां आली नसती काय ? तुझ्या पूर्वजांनी ख्रिश्चनांस कित्येक लढाईत धूळ चारली. तुझ्या हातून ते झाले नाही तर निदान आपल्या घराचे तरी संरक्षण करावयाचे होतेस."*

ज्ञानार्जन


 समाजामध्ये सौख्य, समाधान आणि स्थैर्य निर्माण करण्याचे कार्य सुसंस्कृत माणसांकडूनच होत असते. मानवी जीवनाची शाश्वत मूल्ये कोणती आहेत हे पारखण्याची दृष्टि त्यांना आलेली असत. समाजाला योग्य मार्गदर्शन करून तो सुखी व सर्व दृष्टींनी संपन्न करावयाचें कार्य अशाच सुसंस्कृत व्यक्तींकडून होत असते. इस्लाम अशा व्यक्तींकडे सदैव गौरवाच्या दृष्टीने पाहतो. अत्यंत आदराच्या भावनेने बघतो. सुसंस्कृत व्यक्ति म्हणजे समाजांचे भूषण अशा त्याची भावना आहे. समाजांतील प्रत्येक घटक सुसंस्कृत व्हावा


  • Outline of Islamic Culture, Page 767.