पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

१११


उद्गार काढले आहेत. शरीफची कन्या मलिका, अबदुल्ला अस्विलानी यांची कन्या निसवान् , अबदुर रहिमान, मकदसी यांच्या भगिनी हबीब, इब्री यांच्या कन्या हबीब रुकीया, जैनुल अरब, जयनब, सित्तुल अरब, सित्तुल फुकहा, सित्तुल कुरैश, सित्तुल वोजरा, ताहेरा, सफीया इत्यादि अनेक मुस्लिम विदुषी विख्यात पावल्या आहेत.
 शैक्षणिक क्षेत्रांत मुस्लिम स्त्रियांनी फार मोलाची कामगिरी बजावली आहे. ठिकठिकाणी शिक्षणसंस्था, विद्यालये प्रस्थापित करण्याचे श्रेय त्यांनी मिळविले आहे. खलिफा हारून अल-रशीद यांची पत्नी शिक्षणाची श्रेष्ठ पुरस्कर्ती होती. तिने आपल्या खर्चानें अनेक शिक्षणसंस्था सुरू केल्या होत्या. आजादुद्दौला या इराणच्या बादशहाची बायको अत्यंत सुसंस्कृत होती. तिने सर्व इराणभर विद्यालये प्रस्थापित केली. खातून मलिक अश्रफ या विदषीने दमास्कस येथे महाविद्यालय उघडण्याचे श्रेय घेतलें, सीरियामध्ये नसीरउद्दौला यांची पत्नी झमरूद खातन ही नामांकित विदुषी समजली जात होती. तिनेही एक महाविद्यालय सीरियामध्ये प्रस्थापित केले.

 वक्तत्वांत तर हजरत पैगंबरांच्या कुटुंबांतील व नात्यांतील त्रियांनी अग्रपूजेचा मान मिळविला आहे. हजरत पैगंबरांच्या पत्नी हजरत आयेषा यांच्या असामान्य वक्तृत्वाबद्दल मागें उल्लेख आला आहेच. हजरत पैगंबरांच्या कन्या हजरत फातिमा व नात जयनब यांचे वक्तत्व उत्कृष्ट दर्जाचे समजले जाई. हजरत हुसेन यांच्या कन्या सकैना यांचाही पण तसाच लौकिक होता. सितुल उल्मा या तर इतके सुंदर वक्तृत्व करीत की त्यांना 'बुलबुल' अशी संज्ञा देण्यांत आली होती. खौला, जरका, दारिमिय्या यांचीही वक्तत्वा-